Jalgaon News : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र जळगाव आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद (दिल्ली) केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर यांच्यातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत विशेष कापूस प्रकल्प पीक प्रात्यक्षिक दादा लाड कापूस तंत्रज्ञान २०२३-२४ च्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना अवगत करण्यात आले.(Dada Lad technology revitalization of cotton crop jalgaon agriculture news)
प्रमुख वक्ते वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत मेश्राम (केंद्रीय कापूस संशोधन संस्था,नागपूर) यांनी कापूस सघन लागवड पद्धती अवलंबन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील महाजन (नागपूर) यांनी दादा लाड तंत्रज्ञानाचे उद्देश हेतू व महत्त्व यावर मार्गदर्शन केले. डॉ.हेमंत बाहेती वरिष्ठ शास्त्रज्ञ यांनी प्रास्ताविक केले.
जिल्हा किसान संघ समन्वयक डॉ. दीपक पाटील यांनी दादा लाड तंत्रज्ञान अवलंबत असताना गळ फांदी व शेंडे खुडणी व त्याचा होणारा फायदा शेतकऱ्यांना समजावून सांगितला.
जिल्हा नोडल अधिकारी तथा विषय विशेषज्ञ (कृषी विद्या)डॉ. स्वाती कदम यांनी सूत्रसंचालन केले. कापूस पिकातील सघन लागवड पद्धतीचे फायदे कथन केले. खपाट गावातील सरपंच, गावातील मंडळी उपस्थित होती. डॉ. पाटील यांच्या दादा लाड तंत्रज्ञानाने लागवड केलेल्या प्लॉटवर शास्त्रज्ञांनी पाहणी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.