Jalgaon News : अनेकांच्या वाहनांची दुरुस्ती करतानाच ते दुरुस्त करणाऱ्या तरुणांचे मनही स्वच्छ करण्याचे काम भऊर (ता. चाळीसगाव) व सध्या मेहुणबारे येथे राहत असलेले हभप दादा महाराज करीत आहेत.
त्यांनी आतापर्यंत त्यांच्या गॅरेजमध्ये कामासाठी येणाऱ्या हजारो गाड्यांची दुरुस्ती केली. (Dada maharaj inspired many youth for de addiction jalgaon news)
त्याचबरोबर त्यांच्याकडे आतापर्यंत कामाला आलेल्या आणि त्यांच्या परिघात आलेल्या अनेक तरुणांची व्यसनमुक्ती करून त्यांना शुद्ध शाकाहारी राहण्याबरोबरच अधिकाधिक चांगले व्यवहार करण्याची शिकवण दिली. अनेकांचे संसार घडवले, अनेकांचे जीवन वाढवले. या उपक्रमात केवळ व्यासपीठावरून सांगून ते थांबले नाहीत तर कृतीतून त्यांनी समाज सुधारणेचा विडा उचलला आहे.
भऊर (ता. चाळीसगाव) येथील हभप दादा महाराज यांचे चाळीसगाव-धुळे रसत्यावरील मेहुणबारे येथे माऊली गँरेज आहे. या गँरेजच्या माध्यमातून त्यांचा परिसरात मोठा दांडगा जनसंपर्क आहे. परिसरातील ते उत्तम कीर्तनकारासह गायन देखील चांगले आहे. आजच्या परिस्थितीत दारुचे व्यसन हे तरुणांची ‘स्टाईल’ बनत आहे.
अशा बिघडत्या परिस्थितीत तरुणाईला व्यसनमुक्त व वारकरी संप्रदायाचे महत्त्व पटवून देत अनेक तरुणांना चांगल्या मार्गाला लावण्याचे काम दादा महाराज हे करीत आहेत. त्यांना ही त्यांचे गुरुवर्य गोपालक हभप रविदास महाराज यांच्या आशीर्वादाबरोबर शिकवण मिळाल्याचे दादा महाराज यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शनिमंदिरात पाडला पायांडा
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील दोनशे वर्षापूर्वीचे प्राचीन शनी मंदिर असून, भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. या शनिमंदिरात गेल्या दीड वर्षांपासून प्रत्येक शनिवारी सायंकाळी हरीपाठ, त्यानंतर कीर्तन व संपूर्ण गावाला महाप्रसाद हा भाविकांनकडून दिला जातो.
याचे सर्व नियोजन व या ठिकाणी हा पायंडा पाडण्यासाठी दादा महाराज यांच्यासह शनिभक्त परिवार यांची मेहनतीबरोबर महाराजांचे मोठे योगदान आहे. प्रत्येक शनिवारी आणि शनि अमावस्येला येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते.
कीर्तनाच्या माध्यमातून गावोगावी जनजागृती
व्यसनाधिनता सामाजिक समस्या झाली आहे. व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी समाजात जनजागृती होणे आवश्यक आहे. सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आजचा युवक व्यसनमुक्त झाला पाहिजे.
आज व्यसनांच्या या गुलामीत अडकलेला तरुण त्यातून मुक्त झाला पाहिजे, यावर देखील आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ते गावोगावी जनजागृती करत आसतात. गिरणा परिसरात आज कीर्तनाचे असो वा भजनाचे. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी देखील मोठ्या आशेने येतात. यामुळे ते आज देखील 'माऊली' या नावाने प्रसिद्ध आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.