Jalgaon Heavy Rain Crop Damage : जिल्ह्यात २२ व २४ सप्टेंबरला झालेल्या अतीवृष्टीने सहा तालुक्यांत एकूण ४ हजार ३३५ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमीक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
त्यात सर्वाधिक ३ हजार २२१ हेक्टरवरील कापसाचे नुकसान झाले आहे. (Damage to 4 thousand hectares of agricultural crops in 6 taluka jalgaon news)
२२ व २४ सप्टेबरला चोपडा, पारोळा, पाचोरा, धरणगाव, भडगाव, एरंडोल तालुक्यांत अतीवृष्टी झाली होती. त्यामुळे १२४ गावांतील ६ हजार ६४१ शेतकऱ्यांची शेती बाधीत झाली आहे.
जिरायती पिकांमध्ये ज्वारी १६७ हेक्टर, तूर- ५५, सोयाबीन- २६८, बागायती पिकांमध्ये भाजीपाला- ८८, मका- ५२५, कापूस- ३२२१ हेक्टर असे नुकसान झाले आहे.
चोपडा तालुक्यात १२९ हेक्टर, पारोळा- ५४४, पाचोरा- ९५, भडगाव- १०, एरंडोल- ७७२ आणि धरणगाव तालुक्यात सर्वाधिक २ हजार ७८५ हेक्टर असे एकूण ४ हजार ३३५ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे.
जिल्ह्यात ९२ टक्के पाऊस
जळगाव जिल्ह्यात आत्तापर्यंत ९२ टक्के पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. धरणांची परिस्थीती देखिल समाधानकारक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.