Jalgaon News : अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीने नुकसान; कृषी विभागाचा अंदाज

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान sakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यात आठ व नऊ आणि पंधरा ते सतरा सप्टेंबर या पाच दिवसांत झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील आठ तालुके बाधित झाले असून, तब्बल अडीच हजार हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यातून व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतातूर होते. सप्टेंबरमध्ये मात्र वरूणराजाची पुन्हा कृपा झाली. (Damage to crops on 2500 hectares due to heavy rain jalgaon news)

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाचोरा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, धरणगाव, जामनेर, चोपडा, जळगाव या आठ तालुक्यांत पाच दिवसांत अतिवृष्टी झाल्याने पुर परीस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला.

केळी पिक अक्षरश: झोपले

अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका केळी पिकाला बसला आहे. यासोबतच ज्वारी, तुर, सोयाबीन, भाजीपाला, मका आणि कापूस पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती प्राथमिक अहवालातून समोर आली आहे.

(लोकल ते ग्लोबल लेटेस्ट अपडेट मिळवा सकाळच्या व्हॉट्सअप चॅनेलवर फक्त एका क्लिकमध्ये)

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
Jalgaon News : म्हसवे प्रकल्पातून भोकरबारीला ‘जलदान’; पारोळा तालुक्यातील गावांना सिंचनासह पाणीप्रश्‍नी दिलासा

जिल्ह्यात एकूण आठ तालुक्यांत १५२ गावांतील ३ हजार ३६१ शेतकरी बाधित झाले असून, एकूण २ हजार ४९८.६० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे.

पंचनामे पुर्ण करण्याचे आदेश

जिल्ह्यातील आठ तालुक्यांत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी माहिती घेतली असून, या भागातील शेती पिकांचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

अतिवृष्टीने पिकांचे नुकसान
Rain Alert : उत्तर महाराष्ट्रात आजपासून तीन दिवसांचा ‘यलो अलर्ट’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.