धरणगाव तालुक्यात शिवसेनेला खिंडार; शहरप्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

Gulabrao Patil Latest News
Gulabrao Patil Latest Newsesakal
Updated on

पाळधी (जि. जळगाव) : धरणगाव तालुक्यातील शिवसेनेचे (Shiv sena) उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, युवा सेनेचे शहरप्रमुख व तालुकाप्रमुखांसह असंख्य कार्यकर्त्यांनी राजीनामे देत नेते गुलाबराव पाटील यांच्यासोबत राहणार असल्याचे आज जाहीर केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश करून आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी घेतलेल्या निर्णयास पाठिंबा दर्शविला आहे. यामुळे धरणगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे. (damage to Shiv Sena in Dharangaon Resignations of office bearers including city chief jalgaon Latest political news)

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व धरणगावचे माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील, धरणगाव शिवसेना शहरप्रमुख राजू महाजन यांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.

शिवसेनेचे जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील, पाळधी येथील युवा शहरप्रमुख आबा महाजन, युवा सेनेचे धरणगाव तालुकाप्रमुख बंटी पाटील व बोरगावचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नितीन पाटील यांनी असंख्य पदाधिकाऱ्यांसह आज राजीनामे दिले.

जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्याकडे हे सर्व राजीनामे पाठविण्यात आले आहेत. या सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करण्याची घोषणा केली आहे.

Gulabrao Patil Latest News
सराफ वाड्याची भिंत कोसळून 2 जण जखमी

"शिवसेना वाचविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आम्ही निर्णय घेतला आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत याची खात्री शिवसैनिकांना झाली आहे, त्यामुळे ते आमच्यासोबत आले आहेत. ज्यांना आमची भूमिका पटणार आहे असे अनेकजण भविष्यात आमच्यासोबत येतील."

- गुलाबराव पाटील, आमदार, शिवसेना, जळगाव ग्रामीण

Gulabrao Patil Latest News
Crime Update : दागिने, मोबाईलसह रोख रक्कम घरातून लंपास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.