दामिनी ॲपने वीज पडण्याच्या 15 मिनीटेपूर्वी मिळणार अलर्ट

दामिनी अॅप डाऊनलोड करून त्याचा आपल्या परिसरातील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी उपयोग करावा, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले आहे.
Abhijit Raut
Abhijit Rautesakal
Updated on

जळगाव : लवकरच पावसाळा सुरू होत आहे. जून, जुलैत वीज पडण्याचे प्रमाण अधिक असते. वीज पडण्यापूर्वी पंधरा मिनीटे अगोदर वीज पडेल असा अलर्ट ‘दामिनी’ ॲपने मिळणार आहे. ज्याद्वारे आपण संबंधित ठिकाणावरून लागलीच दूर जाऊन आपला जीव वाचवू शकणार आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दामिनी अॅप डाऊनलोड करून त्याचा आपल्या परिसरातील नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी उपयोग करावा, असे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले.

मॉन्सून कालावधीत विशेषतः जून, जुलैत वीज पडून जिवीत हानी होते. याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पृथ्वी मंत्रालय भारत सरकार (नवी दिल्ली) यांनी ‘दामिनी’ ॲप तयार केले आहे. हे ‘गुगल प्ले स्टोअर’ वर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून आपले नियंत्रणात येणाऱ्या तालुक्‍यातील सर्व शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी/कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी/मंडळ अधिकारी, अव्वल कारकून, महसूल सहाय्यक, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशावर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना हे ॲप डाऊनलोड करून त्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Abhijit Raut
टरबुजाला मातीमोल भाव; शेतकऱ्याने 2 एकर टरबुजांवर फिरवला नांगर

जीपीएस लोकेशनने करणार काम

हे ॲप ‘जीपीएस’ लोकेशनने काम करीत असून वीज पडण्याच्या १५ मिनिटांपूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते. आपल्या ॲपमध्ये आपल्या सभोवतालच्या परिसरात वीज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासून सुरक्षित स्थळी जावे. सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे त्यांना संबंधितांना निर्देश देण्यात येणार आहे. इतर सामान्य नागरिकांनीही हे ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Abhijit Raut
हेडफोन घालून रुळ ओलांडताना रेल्वेनं उडवलं; नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू

‘अलर्ट’ मिळताच कार्यवाही करा

गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना हे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या ‘अलर्ट’नुसार आवश्यक पूर्वसूचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()