Jalgaon News: खानदेशात डांगर मळे उरले नावालाच; नद्या लुप्त होत असल्याचा परिणाम

कधी काळी नदीपात्रातील डांगर, टरबूज खाऊन ढेकर देणारे खानदेशवासीय आता या संधीला मुकण्याच्या अवस्थेत आले आहेत.
Ongoing preparation of Dangarmala in Aner river basin.
Ongoing preparation of Dangarmala in Aner river basin.
Updated on

Jalgaon News : कधी काळी नदीपात्रातील डांगर, टरबूज खाऊन ढेकर देणारे खानदेशवासीय आता या संधीला मुकण्याच्या अवस्थेत आले आहेत. (Dangarmale in riverbed is decreasing in Khandesh jalgaon news)

डिसेंबरमध्येच नद्या लुप्त होऊ लागल्याने नदीपात्रातील डांगरमळे आता खानदेशात नावालाच उरले आहेत. ऐंशी, नव्वदच्या दशकापर्यंत खानदेशात तापी, पांझरा, बोरी, अनेर, अरूणावती, रत्नवाती, वाघूर, अंजनी, तोरी, मोर, गुळी या नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डांगरमळे राहत असत.

बऱ्याचदा नदी पायी पार करणारे प्रवासी, वाटसरू याच वासाने डांगर, टरबूज खाल्ल्याशिवाय पुढे मार्गस्थ होत नसत. याच मळ्यात दोडके, गिलके, कारले, काकडी, पिकत असे. मात्र काळ बदलला, नद्या लुप्त होऊ लागल्या आणि डांगरमळे दिसेनासे झाले. आजही ते काही डोहाजवळ एक, दोन दिसून येतात.

Ongoing preparation of Dangarmala in Aner river basin.
Jalgaon News: पालिकांच्या प्रशासकीय राजवटीस 2 वर्षे पूर्ण; जिल्ह्यात विकासकामे प्रलंबित

खानदेशात भोई, कोळी बांधवांसह अन्य समाजबांधव सुद्धा हा व्यवसाय करत असत. मात्र नद्या लुप्त होऊ लागल्याने हे बांधव अन्य व्यवसायाकडे वळले. आता फेब्रुवारी, मार्च पासूनच नद्या आग ओकू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यातील नदीपात्रातील हिरवाई कधीच लुप्त झाली. भर उन्हाळ्यात नदीपात्रावरून येणाऱ्या थंड गारव्याला गावकरी आता पारखे झाले आहेत.

मात्र आता काही नद्यांमध्ये साचलेल्या डोहाजवळ त्यामधील पाण्याच्या भरवशावर डांगरमळे होत आहेत. या नद्यांमध्ये उन्हाळ्यात धरणाचे पाणी सोडल्यास मळे वाहून जातात तर कधी पाणीच लुप्त झाल्याने सुकून जातात. मात्र खानदेशात आजही ही रिस्क घेऊन काही बांधव हा प्रयोग करत आहेत.

Ongoing preparation of Dangarmala in Aner river basin.
Jalgaon News: सार्वजनिक बांधकाम ‘ना-हरकत’ अटीनुसार कामे करीत नाही : आयुक्त विद्या गायकवाड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.