New Voter Registration : नव मतदार नोंदणीसाठी आता 9 दिवसच मुदत; 1 जानेवारीस 18 वर्षे पूर्ण होणाऱ्यांना संधी

voter registration
voter registrationEsakal
Updated on

New Voter Registration : लोकसभा निवडणुकीपूर्वी सध्या १ जानेवारी २०२४ पर्यंत ज्या तरुण-तरुणींना १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांची मतदार नोंदणी सुरू आहे. १८ वर्षे पूर्ण होऊनही ज्यांनी मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांना नोंदणी करता येणार आहे.

त्यासाठी ९ डिसेंबरपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे. (deadline for new voter registration is now 9 days jalgaon news)

राज्यात एप्रिल २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. त्यासाठी १ जानेवारी २०२४ ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व बीएलओंनी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर जाऊन मतदार नोंदणीचे काम केले आहे.

आता ज्या तरुण-तरुणींना १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण होणार आहेत, त्यांना मतदार नोंदणीत सहभागी होता येणार आहे. तहसील कार्यालयातील निवडणूक शाखेत अथवा बीएलओंकडे त्यांना अर्ज देता येईल.

त्याशिवाय स्वत:च्या मोबाईलवरून अथवा ऑनलाइन केंद्रांवरून मतदार नोंदणी शक्य आहे. ज्यांनी नोंदणी केली नाही, त्यांनी मतदार नोंदणी करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे जिल्हा निवडणूक शाखेतर्फे सांगण्यात आले.

voter registration
Voter Registration : मतदार नोंदणीसाठी आता दहा दिवसच मुदत; १ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण होणाऱ्यांनाही संधी

नवमतदार नोंदणी अन् दुरुस्ती

नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी व इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी ‘वोटर हेल्पलाइन' अॅप उपयुक्त आहे. निवडणूक आयोगाने तयार केलेले ‘अॅप' डाऊनलोड करून घ्यावे. कोणत्याही सरकारी कार्यालयात न जाता ‘अॅप'द्वारे नवीन मतदारांना घरबसल्या मतदारयादीत नाव समाविष्ट करता येते.

त्यासाठी योग्य कागदपत्रे ‘अपलोड' करावी लागतात. दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या मतदारांना नावात दुरुस्ती व छायाचित्रात बदल करता येतो. मृत मतदाराचे नाव नातेवाईक वगळू शकतात. घरपोच मोफत मतदान ओळखपत्र मिळवता येते.

‘गुगल प्ले स्टोअर'वरील https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen या लिंकच्या माध्यमातून या सुविधेचा लाभ घेता येईल.

voter registration
New Voter Registration: दुर्लक्षित घटकांसाठी जळगावात मतदारनोंदणी शिबिर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.