जळगाव : भुसावळच्या रामदेवबाबानगरातील तरुण रोहित दिलीप कोपरेकर (वय २१) याला मित्रांनीच दारू पाजून दगडाने ठेचत खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (ता. ५) शेतात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला होता. या खुनाचा उलगडा करताना गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी बिअरबारच्या सीसीटिव्ही फुटेजवरून मृतदेहाची ओळख पटवल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी बुधवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत दिली. विशेष म्हणजे दारू पाजून दगडाने ठेचण्याचा जळगाव पॅटर्न या गुन्ह्यात वापरला गेला आहे.
भुसावळ शहरातील रोहित दिलीप कोपरेकर ३० मेस हॉटेलमध्ये कामाला जायच्या नावाने घरून ॲक्टीवा दुचाकी (एमएच १९, डीपी २४२३) घेऊन निघाला. मात्र, तीन दिवस उलटूनही तो घरी न परतल्याने भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात २ जूनला हरविल्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी (ता. ५) वांजोळा शिवारातील मीरगव्हाण रस्त्यावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या मागील शेतात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला होता. मृतदेहाजवळ त्याची चप्पल, पँट आदी साहित्य पोलिसांना आढळले होते. त्यावरून तपासचक्रे गतिमान करून स्थानिक गुन्हे शाखेने संशयितांचा शोध सुरू केला.
तांत्रिक तपासाची जोड
मृत रोहित याच्या कुटुंबीयांना बोलवून त्याची ओळख पटविल्यावर बाजारपेठ पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मृताच्या संपर्कात असलेल्या मित्रांसह त्याच्या मोबाईलवर आलेल्या क्रमांकाच्या आधारावर पोलिसांनी काही संशयितांची नावे निष्पन्न केली. गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळापासून जवळच हॉटेल गब्बरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. घटनेच्या दिवशीची त्याच्यासोबत असलेले मित्र राहुल राजेश नेहते (रा. पाटील मळा, भुसावळ), सागर दगडू पाटील (खडका, भुसावळ) यांना ताब्यात घेतले.
खुनाचा जळगाव पॅटर्न
जळगाव पिंप्राळा रेल्वे गेटजवळील मालधक्क्यावर २५ मेस अनिकेत गणेश गायकवाड याला त्याच्या मित्रांनीच दारू पाजून दगडाने ठेचत खून केला. ३ जूनला कासमवाडी परिसरात सागर पाटील याचा त्याच्याच मित्रांनी दारू पाजून लोखंडी रॉड डोक्यावर मारत व दगडाने ठेचून खून केला. तशाच पद्धतीने वांझोळा येथे रोहित याचा दोरीने गळा आवळून नंतर दगडाने ठेचून खून करण्यात आला.
खुनाचे कारण गुलदस्त्यात
रोहित कोपरकर याचा दारू पाजून, दोरीने गळा आवळला, तेव्हा तो जिवंत होता. मात्र, राहुलने त्याच्या डोक्यात दगड टाकून त्याला संपविला. अटकेतील दोन्ही संशयितांमध्ये राहुल याला जीवानीशी मारण्यावरून घटनास्थळावरच झोंबाझोबी झाली. अखेर त्याची हत्या करण्यात आली. खुनाचे कारण अटकेतील संशयित अद्यापही सांगत नसून मृताने नुकतीच दुचाकी घेतली होती. ‘त्याची चिड माझ्या डेाक्यात होती’, असेच राहुल सांगतोय. प्रेमप्रकरण, व्याजाचे पैसे किंवा इतर कोणत्या कारणावरून इतक्या निघृणपणे रोहितची हत्या करण्यात आली, याचा पोलिस शोध घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.