विजेच्या धक्याने बैलाचा मृत्यू; शेतकऱ्याची भरपाईची मागणी

Bull Dies in electricity Shock
Bull Dies in electricity Shockesakal
Updated on

पातोंडा (जि. जळगाव) : शेतात कपाशीची लागवड करीत असताना जवळच्या विद्युत रोहित्राला (Vidyut Rohitra) ताण दिलेल्या तारेचा शॉक (Electric Shock) लागून बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली. बैलाच्या मृत्यूला वीज कंपनीचा गलथान कारभार कारणीभूत असल्याने झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी, अशी मागणी बैलमालकाने केली आहे. (Death of bull by electric shock Demand for compensation from farmer jalgaon news)

येथील शेतकरी अरूण पाटील व भगवान पाटील हे दोघे भाऊ त्यांच्या शेतात बैलजोडीने कपाशीसाठी सऱ्या पाडत होते. शेतातील रोहित्राला ताण दिलेल्या तारेचा धक्का बैलाला अचानक लागला. तारेत विद्युत प्रवाह असल्याने बैल जागीच कोसळला. तारेत विद्युत प्रवाह उतरल्याचे सुदैवाने लक्षात आल्याने अरूण पाटील थोडक्यात बचावले. पेरणीच्या पार्श्‍वभूमीवर महिन्यापूर्वी त्यांनी एक लाखात बैलजोडी विकत घेतली होती. महावितरणच्या बेजबाबदार कारभारामुळेच आपल्या बैलाचा जीव गेल्याचे पाटील यांनी सांगितले.

या घटनेची माहिती अरूण पाटील यांनी तलाठी जितेंद्र पाटील यांना दिल्यानंतर वीज कंपनीचे कनिष्ठ अभियंता उमेश वाणी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र गाढे, लाईनमन सुरेश नेरकर व मदतनीस भूषण कोळी यांनी शेतात येऊन पाहणी केली. चाळीसगाव इलेक्ट्रीक सेक्टरचे तंत्रज्ञ येऊन पंचनामा करतील त्यानंतर नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भातील पुढील प्रक्रिया होईल, असे शेतकरी पाटील यांना सांगण्यात आले. डॉ. रवींद्र गाडे यांनी पाऊस सुरु असतानाही घटनास्थळी जाऊन बैलाचे शवविच्छेदन केले.

Bull Dies in electricity Shock
Corona Update : 12 नवे रुग्ण; सक्रिय रुग्णसंख्या पोचली 36 वर

दरम्यान, ऐन पेरणीच्या काळात बैलाचा मृत्यू झाल्याने शेतकरी अरुण पाटील यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे. यापूर्वी अशा घटनांमध्ये वर्ष होऊनही नुकसान भरपाई मिळू शकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची गरज लक्षात घेता, या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतांमधील रोहित्रांसह वीज तारांसंदर्भात वीज कंपनीने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Bull Dies in electricity Shock
Jalgaon : बहादरपूरला फिरत्या न्यायालयात 2 फौजदारी खटले निकाली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.