Deccan Queen Railway : ‘दख्खनची राणी’ झाली 93 वर्षांची..! मध्य रेल्वेची डीलक्स ट्रेन डायनिंग

Deccan Queen train completes 93 years jalgaon news
Deccan Queen train completes 93 years jalgaon newsesakal
Updated on

Jalgaon News : महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरांमध्ये १ जून १९३० ला ‘डेक्कन क्वीन’ची सुरवात हा मध्य रेल्वेचा अग्रदूत असलेल्या ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा होता. (Deccan Queen train completes 93 years jalgaon news)

डेक्कन क्वीनमधील डायनिंग टेबल.
डेक्कन क्वीनमधील डायनिंग टेबल.esakal

या प्रदेशातील दोन महत्त्वाच्या शहरांना सेवा देण्यासाठी रेल्वेवर दाखल करण्यात आलेली ही पहिली डीलक्स ट्रेन होती आणि तिला पुण्याचे नाव देण्यात आले होते. ज्याला ‘दख्खनची राणी’ (‘दख्खन की रानी’) असेही म्हटले जाते. या रेल्वेगाडीला गुरुवारी (१ जून) ९३ वर्षे पूर्ण होत आहेत.

सुरवातीला ही रेल्वेगाडी प्रत्येकी सात डब्यांच्या दोन रेकसह सादर करण्यात आली होती. ज्यापैकी एक स्कार्लेट मोल्डिंगसह चंदेरी आणि दुसरा सोनेरी रेषांसह रॉयल ब्लू रंगाने रंगवलेला होता. मूळ रेकच्या डब्यांच्या अंडर फ्रेम्स इंग्लंडमध्ये बांधण्यात आल्या होत्या, तर कोचच्या बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये बांधण्यात आल्या होत्या.

डेक्कन क्वीनमध्ये सुरवातीला फक्त प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीची सोय होती. १ जानेवारी १९४९ ला प्रथम श्रेणी रद्द करण्यात आली आणि द्वितीय श्रेणीची प्रथम श्रेणी म्हणून पुनर्रचना करण्यात आली, जी जून १९५५ पर्यंत सुरू राहिली. जेव्हा या ट्रेनमध्ये प्रथमच तृतीय श्रेणी सुरू करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Deccan Queen train completes 93 years jalgaon news
Railway Stations : परदेशात जाण्यासाठी फक्त विमानच नाही, तर रेल्वेनेही जाऊ शकता; ९० टक्के लोकांना हे माहित नसेल!

त्यानंतर एप्रिल १९७४ पासून द्वितीय श्रेणी म्हणून पुन्हा नियुक्त केले गेले. मूळ रेकचे डबे १९६६ मध्ये इंटिग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूर येथे बांधलेले ॲन्टि-टेलिस्कोपिक स्टील बॉडीच्या इंटिग्रल कोचेसमध्ये बदलण्यात आले.

या डब्यांमध्ये उत्तम आरामदायी प्रवासासाठी बोगींचे सुधारित डिझाइन आणि आतील सजावट, फिटिंग्जमध्ये सुधारणा समाविष्ट केल्या आहेत. अधिक क्षमता वाढविण्यासाठी रेकमधील डब्यांची संख्याही मूळ सात डब्यांवरून वाढवून १२ करण्यात आली होती. कालांतराने ट्रेनमधील डब्यांची संख्या सध्याच्या १७ डब्यांच्या पातळीपर्यंत वाढविण्यात आली आहे.

आसन क्षमतेत १५ टक्क्यांनी वाढ

चांगल्या सुविधा, आरामदायी दर्जा आणि सेवेचा दर्जा उत्तम यांसाठी प्रवासी जनतेच्या सतत वाढत असलेल्या आकांक्षांसह डेक्कन क्वीन ट्रेनमध्ये संपूर्ण बदल करणे आवश्यक मानले गेले. त्यामुळे विशेष वैशिष्ट्यांसह रेक १९९५ मध्ये बदलण्यात आला. जुन्या रेकमधील पाच फर्स्ट क्लास चेअर कारच्या जागी पाच एसी चेअर कारमध्ये बदलण्यात आले.

आसन व्यवस्था
आसन व्यवस्था esakal
Deccan Queen train completes 93 years jalgaon news
Central Railway : प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस 'या' दिवशी होणार सुरू

ज्यामुळे धूळमुक्त वातावरणात ६५ अतिरिक्त आसन क्षमता प्रदान. तसेच ९-द्वितीय श्रेणीच्या चेअर कार जुन्या डब्यांच्या तुलनेत १२० आसनांची अतिरिक्त आसन क्षमता प्रदान करण्यात आली. अशाप्रकारे जुन्या रेकमध्ये एक हजार २३२ जागांच्या तुलनेत नवीन रेकमध्ये एकूण एक हजार ४१७ आसन क्षमता प्रदान केली आहे, म्हणजेच १५ टक्क्यांनी त्यात वाढ झाली आहे.

अशा आहेत सोयी-सुविधा

डायनिंग कार ३२ प्रवाशांसाठी टेबल सेवा देते आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर आणि टोस्टर यांसारख्या आधुनिक पॅन्ट्री सुविधा आहेत. डायनिंग कारदेखील कुशनच्या खुर्च्या आणि कार्पेटने सुसज्ज आहे.

सुधारित संरचनेत चार एसी चेअर कार, आठ द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक एसी डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार अशी आरामदायी प्रवासाची अनुभूती प्रवाशांना मिळत आहे.

Deccan Queen train completes 93 years jalgaon news
Jalgaon Sharad Pawar : शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेरात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.