Jalgaon NMU News : ‘उमवि’ संलग्न 24 महाविद्यालयांना ‘नो ॲडमिशन’चा दणका; नॅक मूल्यांकन टाळणे महागात

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Bahinabai Chaudhari uttar Maharashtra Universityesakal
Updated on

Jalgaon NMU News : नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन, तसेच एनबीए प्रक्रिया न केलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न २४ महाविद्यालयांमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी ‘नो ॲडमिशन’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

विद्यापीठ विद्या परिषदेच्या बैठकीत या निर्णयास सहमती देण्यात आली.

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक मंगळवारी (ता. १८) झाली. प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील उपस्थित होते. (decided to do no admission for this academic year in 24 colleges affiliated to Uttar Maharashtra University jalgaon news)

मूल्यांकन होते अनिवार्य

शासनाने सर्व विद्यापीठांना पत्र पाठवून महाविद्यालयांचे मूल्यांकन व पुनर्मूल्यांकन करावे, असे कळविले होते. नॅक वैधता संपुष्टात आलेल्या महाविद्यालयांनी प्रक्रिया तत्काळ सुरू करून ३१ मार्च २०२३ पर्यंत प्रारंभीच्या टप्प्यातील संस्था नोंदणी करून आयआयक्यूए नॅक कार्यालयाला सादर करणे अनिवार्य असल्याचे शासनाच्या २ मार्च २०२३ च्या पत्रात म्हटले होते.

आयआयक्यूए सादर न केल्यास प्रथम वर्षाच्या प्रवेशास निर्बंध लागू करण्यात येतील, असे कळविले होते. विद्यापीठाने सर्व महाविद्यालयांना याबाबत कळविले होते.

महाविद्यालयांनी केले दुर्लक्ष

२४ महाविद्यालयांनी प्रक्रिया केली नाही, तसेच आयआयक्यूएदेखील सादर केला नाही. त्यामुळे त्या महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष प्रवेशाला बंदी घालण्याचा विषय २८ जूनला झालेल्या बैठकीत ठेवला होता.

या बैठकीत नॅकसाठी प्रक्रियेला सामोरे न गेलेल्या/आयआयक्यूए सादर न केलेल्या महाविद्यालयांना प्रवेश निषिद्ध (नो ॲडमिशन) समजण्यात यावे. नॅकसाठी पाच वर्षांच्या आतील सुरू झालेल्या महाविद्यालयांना वगळण्यात यावे, असा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला विद्या परिषदेच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत सहमती दर्शविण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon Govt Polytechnic : पदविकेसाठी जिल्ह्यात साडेचार हजार अर्ज; यंदा प्रवेशाच्या 3 फेऱ्या

या महाविद्यालयांमध्ये यंदा ‘नो ॲडमिशन’

या महाविद्यालयांत प्रतिभाताई पवार महाविद्यालय, गोदावरी संगीत व फाईन आर्ट महाविद्यालय, आर. आर. वरिष्ठ महाविद्यालय (सर्व जळगाव), मराठा जेडीएमव्हीपीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (वरणगाव), धनदाई माता एज्युकेशन संस्थेचे कला व विज्ञान महाविद्यालय (अमळनेर), कमल अक्का पाटील कला व वाणिज्य महाविद्यालय (अमळनेर), कला महाविद्यालय (पिंपळगाव हरेश्वर, ता. पाचोरा), पब्लिक एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (देवपूर, वलवाडी भोकर, धुळे),

(कै.) बापूसाहेव शिवाजीराव देवरे कला व वाणिज्य महाविद्यालय (बोरीस, जि. धुळे), सरदार एज्युकेशन संस्थेचे हाजी सईद अहमद सरदार कला व विज्ञान महाविद्यालय (देवपूर, धुळे), विशाल शिक्षणप्रसारक मंडळाचे ए. बी. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (महिंदळे, धुळे), एनटीव्हीएसचे कला, वाणिज्य महाविद्यालय (धानोरा, जि. नंदुरबार), ग्रामीण विकास शिक्षणप्रसारक मंडळाचे (कै.) एम. डी. सिसोदे कला व वाणिज्य महाविद्यालय (नरडाणा, ता. शिंदखेडा), म. ज. पोहऱ्या वळवी कला व वाणिज्य.

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon News : महापालिकेच्या बुडाखाली साचतेय पाण्याचे तळे; दुरुस्तीबाबत पदाधिकारी, अधिकाऱ्यांचे डोळे बंद

वि. कृ. कुलकर्णी महाविद्यालय (धडगाव, जि. नंदुरबार), एम. जी. तेले वाणिज्य, चिंधा व बारकू रामजी तेले विज्ञान आणि केशरबाई तेले व्यवस्थापन महाविद्यालय (थाळनेर, जि. धुळे), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (पाल, जि. जळगाव), आर. के. मिश्रा वरिष्ठ महाविद्यालय (बहादरपूर, जि. जळगाव), कर्मवीर व्यंकटराव रणधीर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (बोराडी, जि.धुळे),

अमर संस्था संचलित कला महाविद्यालय (चोपडा), विद्या विकास मंडळ संचलित कला, वाणिज्य महाविद्यालय (अक्कलकुवा), आदिवासी देवमोगरा शिक्षण संस्थेचे के. डी. गावित कला महाविद्यालय (धानोरा, जि. नंदुरबार), बळीराम पाटील कला व विज्ञान महाविद्यालय (बेहेड, जि. धुळे), ग्रामविकास शिक्षण मंडळाचे (कै.) न्हानाभाऊ मन्साराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय (मारवड, जि. जळगाव), श्रीमती सीताबाई मांगीलाल अग्रवाल ट्रस्टचे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (चाळीसगाव, जि. जळगाव).

Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University
Jalgaon Bribe Crime : पोलिस निरीक्षकासह कर्मचारी, पंटरला लाच घेताना अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.