Jalgaon Banana Purchase : केळी खरेदीत जादा कटती लावल्यास फौजदारी गुन्हा; पाचोरा बाजार समितीचा निर्णय

banana crop
banana cropesakal
Updated on

Jalgaon Banana Purchase : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पाचोरा व भडगाव तालुक्यातील केळी खरेदीत तीन टक्के ऐवजी दीड टक्के कटतीचा निर्णय झाला असून, जादा कटती लावणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय बाजार समिती पदाधिकारी व सर्वसमावेशक समितीच्यावतीने घेण्यात आला असल्याचे पत्रक सभापती गणेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे. (decided to reduce purchase of bananas in Pachora and Bhadgaon taluka by one and half percent jalgaon news)

पत्रकात नमूद केले आहे, की पाचोरा व भडगाव तालुक्यात केळीला तीन टक्के कटती लावण्यात येत होती. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी बाजार समिती सभापती गणेश पाटील, उपसभापती पी. एन. पाटील यांनी संचालक मंडळाची बैठक घेतली.

या बैठकीत केळी कटतीच्या टक्केवारीसंदर्भात योग्य तो निर्णय घेण्यासाठी अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. या समितीत बाजार समिती संचालक केळी, व्यापारी, केळी उत्पादक शेतकरी प्रतिनिधी यांचा समावेश होता. या समितीने केळी कटतीसंदर्भात योग्य तो अभ्यास केल्यानंतर सभापती गणेश पाटील, उपसभापती व संचालक मंडळासोबत समितीची संयुक्त बैठक झाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

banana crop
Jalgaon Banana Crop : जिल्ह्यातील केळीला आखाती देशात मागणी! यंदा 1 हजार 800 कंटेनर्स निर्यातीची अपेक्षा

या बैठकीत केळीसाठी तीनऐवजी दीड टक्के कटती लावावी, असा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्याद्वारे पाचोरा व भडगाव तालुक्यातील केळी खरेदीदार व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना घ्यावा. विनापरवाना केली खरेदी करू नये. दीड टक्के पेक्षा जास्त कटती नसावी. अन्यथा याबाबत तक्रारी आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात करण्याचा निर्णय झाला. यामुळे केळी उत्पादक शेतकरी सुखावले आहेत.

"कृषी उत्पन्न बाजार समितीने तीन टक्के कटतीचा दर दीड टक्के करण्याचा निर्णय घेतला असून, व्यापाऱ्यांनी सक्तीने जादा कटती केल्यास शेतकऱ्यांनी बाजार समितीकडे तक्रार करावी. त्या तक्रारीच्या आधारे संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल." - गणेश पाटील, सभापती, कृउबा समिती, पाचोरा.

banana crop
Ripen Banana : केळी पिकून काळी पडू लागली म्हणून फेकू नका, फेकण्याऐवजी असा करा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()