Jalgaon News: महामार्गाबाबत निर्णयाचा चेंडू न्हाई कोर्टात; रावेर मार्गे जाण्यावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित

 National Highway
National Highwayesakal
Updated on

Jalgaon News: तळोदा - बऱ्हाणपूर या नियोजित राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाचे आदेश काढले आहेत व प्रक्रियाही सुरू केली आहे.

वर्षभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश वरिष्ठांकडून देण्यात आल्याने या मार्गात बदल होऊन तो मुक्ताईनगरऐवजी पुन्हा पूर्वीप्रमाणेच रावेर मार्गे बऱ्हाणपूर जाईल काय? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (decision regarding Taloda Burhanpur highway is in Nhai jalgaon news)

या महामार्गाच्या भूसंपादनासाठी ७ नोव्हेंबरला आदेश काढण्यात आला आहे. त्यावरून अमळनेर, चोपडा आणि भुसावळ या प्रांत कार्यालयांनी भूसंपादनाची कार्यवाही सुरू केली आहे. ती वर्षभरात पूर्ण होईल, अशी अपेक्षा जळगाव येथील भूसंपादन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

हा महामार्ग रावेर शहरासह तालुक्याच्या पूर्व भागात मुक्ताईनगरकडे वळविल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार रक्षा खडसे यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात येणार असल्याचे सांगितले असले तरी स्थानिक पातळीवरील अधिकारी असा कोणताही निर्णय घेऊ शकत नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आता या निर्णयाचा चेंडू राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ('न्हाई') वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व थेट केंद्रीय रस्ते बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेच असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

 National Highway
Jalgaon News: डांबरीकरणाच्या आच्छादनाअभावी शिवाजीनगर पुलावर धोका; सांधे जोडफटींमध्ये होतेय वाढ

निर्णय अचानक कसा बदलला?

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भूसंपादन विभागाने २४ जानेवारी २०२२ ला काढलेल्या आदेशात हा रस्ता रावेर शहराजवळून सध्याच्या रावेर - बऱ्हाणपूर रस्त्याच्या डावीकडून म्हणजे केऱ्हाळा - मंगरूळ भागातून बऱ्हाणपूरकडे जाणार असल्याने त्या भागात भूसंपादन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता अचानक असा बदल का झाला? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे.

गडकरींकडे प्रश्‍न मांडणार : चौधरी

हा महामार्ग विवऱ्याकडून रावेरकडे जाण्याऐवजी मुक्ताईनगरमार्गे वळविण्यामागे त्या भागात ज्यांनी जमिनी खरेदी करून ठेवल्या आहेत, त्यांचा फायदा करून देण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप आमदार शिरीष चौधरी यांनी केला. रावेर शहर व परिसराला महामार्ग चौपदरीकरणापासून पर्यायाने विकासापासून दूर ठेवण्याचा हा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच लक्ष घालून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांना करणार असल्याचे आमदार चौधरी यांनी सांगितले.

 National Highway
Kamayani Express : कामायनी एक्स्प्रेस आता बलिया स्थानकापर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.