Jalgaon News : शहरातील तीनशे चौरस फुटाच्या घरांना घरपट्टी माफ करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र, हा ठराव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाने मंजूरी दिल्यानंतरच त्याची अमलबजावणी करण्यात येणार आहे.
त्यामुळे सद्यस्थितीत कोणतीही माफी नाही, नागरिकांनी घरपट्टी नियमीत भरावी. असे अवाहन आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी केले आहे. (decision to waive house is only after government order jalgaon news)
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कि शहरात ३०० चौरस फुटाच्या २३ हजार ७३३ मिळकती आहेत. त्यांच्याकडे चालू मागणी चार कोटी ५१ लाख ७४७ हजारांची आहे. मागील थकबाकीसह २१७ कोटी १० लाख ९ हजार २४७ रूपयांची मागणी आहे. तर सात हजार सातशे चाळीस मिळकतधारकांकडे पाणी कनेक्शन आहे.
त्यांच्या चालू व मागील बाकिसह ३४ कोटी ४४ लाख १ हजार ८३० रूपयांची मागणी आहे. साधरण पाणीपट्टी व घरपट्टी मिळून दरवर्षी ५ कोटी ८५ लाख ५७ हजाराची मागणी असते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
३०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या मिळकतधाराकांचे कर भरण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे या घरांना करमाफी दिल्यास महापालिकेचे मोठे नुकसान होईल, असे महापालिका प्रशासनाचे मत आहे. परंतु, महासभेत मंजूर करण्यात आलेला करमाफीचा ठराव शासनाकडे मंजूरीस पाठविण्यात येईल.
मंजूरी आल्यानंतरच त्याची अमंलबजावणी करण्यात येईल. तोपर्यंत ३०० चौरसफुट क्षेत्रफळ असलेल्या कोणत्याही मालमत्तेस करमाफी नाही. त्यामुळे नागरिकांनी आपल्या कराचा भरणा नियमीत करावा. अन्यथा मासिक दोन टक्के प्रमाणे दंड आकारणी करण्यात येईल, असा ईशाराही आयुक्त डॉ. गायकवाड यांनी दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.