Jalgaon News : तळमजल्यावरील दुकानावर कारवाईचे लवकर धोरण

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : शहरातील व्यापारी संकुलांच्या तळमजल्यावर पार्किंगऐवजी काढण्यात आलेल्या दुकानांवर कारवाई करण्यासाठी पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. महापालिका अधिकाऱ्यांची त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, त्यांच्यातर्फे निर्णय घेण्यात येणार आहे. (decision will taken next week to take action against shops that have removed instead of parking on ground floor of commercial complexes jalgaon news)

शहरातील व्यापारी संकुलाच्या तळमजल्यावर वाहतळाच्या जागेवर दुकाने काढली आहेत. याबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. त्याची दखल घेऊन महापालिकेने गेल्या वर्षभरापूर्वी नेहरू चौक ते घाणेकर चौकादरम्यान व्यापारी संकुलाचे सर्वेक्षण केले होते. यात अनेक दुकानदारांनी आपल्या पार्किंगच्या जागा दाखवून ते उपयोगात घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.

यावर महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे सुनावणीही घेण्यात आली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही कारवाई झाली नाही. उलट कारवाईसाठी अतिक्रमण निर्मूलन विभागाला दिलेले आदेश सत्ताधारी नेत्यांनी रद्द केले होते.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Jalgaon Municipal Corporation
Hanuman Jayanti 2023 : लोण्याच्या मूर्तीचे तीर्थक्षेत्र अवचित हनुमान!

मात्र, शहरात तळमजल्याबाबत वाढत असलेल्या तक्रारी लक्षात घेता, नुकताच आयुक्त डॉ. विद्या गायकवाठ यांनी कारवाईसाठी त्रिसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. यात मुख्य लेखाधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखापरीक्षक तथा उपायुक्त (सामान्य प्रशासन), उपायुक्त (महसूल) यांचा समावेश असून, एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात या समितीची बैठक होऊन तळमजल्यावरील दुकानाबाबत धोरण निश्‍चित करण्यात येणार आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : रस्त्याचे काम थांबवा, कॉंक्रिटीकरण करायचेय; ‘अंधेरनगरी चौपट राजा’चा प्रत्यय!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()