Jalgaon Girls Birth Rate : जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदरात घट; गर्भलिंग निदान कायदा अंमलबजावणीबाबत प्रश्‍नचिन्ह

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोनोग्राफी मशिनची दर तीन महिन्यांनी तपासणी होत असल्याचा दावा आरोग्य यंत्रणा करीत असली तरी प्रत्यक्षात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटलेले दिसते.
Girls Birth Rate
Girls Birth Rateesakal
Updated on

Jalgaon Girls Birth Rate : गेल्या काही वर्षांपासून अनेक समाजात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटत आहे. यामुळे उपवर मुलांना संबंधित समाजात उपवर मुली मिळत नसल्याचे चित्र आहे. २०२१ मध्ये जिल्ह्यात मुली जन्माचे प्रमाण हजार पुरुषांमागे ८९१ होते.

त्यात २०२२ मध्ये वाढ होऊन ९२२ झाले. मात्र २०२३ मध्ये हे प्रमाण पुन्हा घटले असून हजार पुरुषांमागे ९१५ महिला असे आता आहे. (Decline in birth rate of girls in jalgaon district news)

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोनोग्राफी मशिनची दर तीन महिन्यांनी तपासणी होत असल्याचा दावा आरोग्य यंत्रणा करीत असली तरी प्रत्यक्षात मुलींच्या जन्माचे प्रमाण घटलेले दिसते. ही बाब चिंताजनक अन सामाजिक असमतोल होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख २९ हजार ९१७ आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २८ लाख ८७ हजार २०६ तर शहरी भागात १३ लाख ४२ हजार ७११ नागरिक राहतात.

जिल्ह्यात शिक्षणाचे प्रमाण केवळ ६८ टक्के आहे. अद्यापही ३२ टक्के नागरिक अशिक्षित आहेत. दिवसेंदिवस वाढणारी महागाई, त्यात शासकीय नोकऱ्यांची वानवा, खासगी कंपन्यांत दहा ते बारा तास काम करूनही अपेक्षीत न मिळणारा मोबदला, यांमुळे नागरिक कुटुंबातील संख्या वाढू देत नसल्याचे चित्र आहे.

एक किंवा दोन मुलांवर घरात लांबणारा पाळणा थांबविला जातो. किंवा गर्भपातासारख्या बेकायदा गोष्टी केल्या जातात. गर्भलिंग चाचणी कायद्याने गुन्हा असला तरी अगोदर मुलगी आहे, दुसरी किंवा तिसरी मुलगी नको म्हणून गर्भलिंग चाचण्यांना अधिकचे पैसे मोजले जातात.

Girls Birth Rate
Jalgaon News : मराठा ओबीसी समाज बांधवांनी एकत्र राहणे गरजेचे : प्रवीण गायकवाड

नाहीच झाले तर उधना (सुरत), बीड येथे गर्भपात करून देणाऱ्यांचा आश्रय घेत रातोरात गर्भपात करून परत सकाळी जळगावला येणारे दांपत्यही आहेत. सोनोग्राफी सेंटरची नियमित तपासणी करणे, कधी डमी महिला पाठवून खरोखरच गर्भलिंग चाचणी होतात किंवा नाही याची शहानिशा करणे, अशा पध्दतीचा अवलंब जिल्हा आरोग्य यंत्रणेने करणे गरजेचे आहे.

सोनोग्राफी केंद्रांविषयीच्या अनेक तक्रारी सामाजिक कार्यकर्त्यांना मांडायच्या असतात मात्र त्या मांडण्यासाठी असलेल्या ‘पीसीॲण्डपीडीटी’ समितीच्या बैठका कधी होतात हेही कळत नाही. जेव्हा तक्रार दिली जाते तेव्हा आताच तर बैठक झाली.

पुन्हा तपासणी कशी करणार, असा प्रतिप्रश्‍न करून संबंधित यंत्रणेच्या समितीतील अधिकारी वेळ मारून नेत असल्याचा आरोप होत आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी लक्ष घालून नागरिकांचे प्रबोधन करून मुली जन्माचे प्रमाण कसे वाढेल? याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

गेल्या चार वर्षांतील मुलींचे गुणोत्तर असे वर्ष मुलींची संख्या

२०२०-२१--९०९

२०२१-२२---८९१

२०२२-२३--९२२

२०२३-२४--९१५

Girls Birth Rate
Jalgaon News: भलेपणाच्या उपकाराचे कसे मानू आभार..? गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी प्रकट मुलाखतीत उलगडला जीवनप्रवास

तालुकानिहाय वर्षानुसार मुलींची संख्या

२०२०-२१-२०२१-२२--२०२२-२३-२०२३-२४

अमळनेर--८९५-९३९-९४४--९१९

भडगाव-८४६-९०७-९४७-८९२

भुसावळ-९३४-१०४२--९९१-९४८

बोदवड-९३५-८५८-८९०-८६८

चाळीसगाव-८९८-९६३-९२३-८९५

चोपडा-८९७-८९७-९५१-९१५

धरणगाव-९३८-७९६-७९६-९५०

एरंडोल-८७२-९२२--९८६-८१२

जळगाव-९३७-८७८-९१९-९५५

जामनेर-८६१-९६३-८७७-९०७

मुक्ताईनगर- ९१०-९०४-९२८-८८६

पाचोरा--८९२-९३०-९१२-९५४

पारोळा--८३४-८४२--१००६-९०४

रावेर--८४८-९८०-९४१-८९५

यावल--९००-८९०-९५९-९०९

एकूण--९०९--८९१-९२२-९१५

"जिल्ह्यात धरणगाव, एरंडोल, जामनेर, जळगावमध्ये मुली जन्माचे प्रमाण कमी आहे. संबंधित ठिकाणी अधिक जनजागृतीसोबत सोनोग्राफी सेंटरवर नियमित तपासणी करण्यास पोलिस व आरोग्य यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. जामनेरला नुकतीच एका सोनोग्राफी सेंटरवर कारवाई केली आहे." - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

"जिल्ह्यात सर्वच सोनोग्राफी सेंटरची तपासणी जिल्हा व तालुकास्तरीय समिती करते. मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जनजागृती केली जाते. मात्र इतर राज्यात जाऊन सोनोग्राफीचे प्रमाण वाढले आहे. संबंधितांना कायद्याच्या चौकटीत बसवून कारवाई करण्यात येत आहे." - डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक

Girls Birth Rate
Jalgaon Municipality News : मनपा अधिकाऱ्यांचा ‘मूक मोर्चा’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.