स्टीलच्या दरात हजार- पंधराशेने घट; बांधकाम क्षेत्राला दिलासा

स्टीलची वाढती दरवाढ पाहता केंद्र सरकारने नुकताच स्टीलच्या निर्यातीवर निर्यातशुल्क लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.
 steel prices
steel pricessakal
Updated on

जळगाव : गेल्या वर्षभरात बांधकाम साहित्याचे दर कमालीचे वाढले. स्टीलही त्याला अपवाद नाही. मात्र, केंद्र सरकारने स्टीलच्या निर्यातीवर निर्यात शुल्क लागू केल्यामुळे गेल्या आठवडाभरात स्टीलचे दर प्रतिटन हजार- पंधराशेने खाली आले असून बांधकाम क्षेत्रासाठी हा दिलासा मानला जात आहे. (Decline in steel prices)

गेल्या वर्ष, दोन वर्षांत बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले. नोटबंदी, जीएसटी, रेरा यासारखे निर्णय झाल्यानंतर आधीच अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायात साहित्याच्या वाढत्या दरांमुळे नवी आव्हाने निर्माण झाली. स्टील, सिमेंट, टाइल्स यासारख्या साहित्याचे दर गेल्या दीड वर्षात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत वाढलेत. त्यामुळे गृह बांधकाम सामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही व बांधकाम व्यावसायिकांच्या गृह प्रकल्पांच्या व्यवहारांवरही त्याचा विपरीत परिणाम झाला.

 steel prices
यंदा कपाशीचे क्षेत्र वाढणार...

स्टीलचे दरही चढेच

वर्षभरात स्टीलच्या दरातही मोठी वाढ झाली. गेल्या वर्षी साधारण ५० ते ५५ रुपये किलो या प्रमाणे आसारी (स्टील) मिळत होते, त्याचा भाव थेट ८० ते ८५ रुपयांपर्यंत गेला. त्यामुळे इमारतीच्या मूळ रचनेलाच लागणाऱ्या या मोठ्या साहित्याच्या दरवाढीने बांधकाम व्यवसायाचेही बजेट बिघडले.

रशिया- युक्रेन युद्धाचा परिणाम

अर्थातच रशिया- युक्रेनमधील युद्धाने या दरवाढीत आग ओतण्याचे काम केले. काही प्रमुख देशांमधील निर्यात थांबल्याने भारतातील स्टीलला मागणी वाढली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला भाव मिळू लागल्याने स्टीलची निर्यात वाढली.

 steel prices
दिव्यांगाच्या कलाकृतीची ‘इंडिया बुक रेकॉर्ड'कडून दखल

...अखेर निर्यात शुल्क लागू

स्टीलची वाढती दरवाढ पाहता केंद्र सरकारने नुकताच स्टीलच्या निर्यातीवर निर्यातशुल्क लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे निर्यातीला आपोआपच ब्रेक लागला असून उत्पादित होणारे सर्व स्टील आता भारतातच विकावे लागणार आहे. त्यामुळे आठवडाभरात स्टीलचे दर ८० वरुन पुन्हा ६५ रुपये किलो असे घसरले आहेत. निर्यातशुल्क लावल्याचा परिणाम आणखी काही दिवसांत दिसून येईल व स्टीलचे दर आणखी चार- पाच रुपयांनी तर घसरतील, असे बोलले जात आहे.

बांधकाम क्षेत्राला दिलासा

अन्य साहित्याच्या वाढत्या दरांमध्ये आता स्टीलचे दर घटू लागल्याने बांधकाम क्षेत्राला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अर्थात, यामुळे स्टीलची साठेबाजीही रोखली जाणार आहे. आता सिमेंटचे दरही खाली यावेत, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

 steel prices
Jalgaon : सतरा मजलीत पाणीटंचाई; कर्मचाऱ्यांची पाण्यासाठी धावपळ

असे आहेत प्रतिटन दर

आठवड्यापूर्वी : ८ हजार रुपये

आताचे दर : ६५०० रुपये

''केंद्र सरकारने स्टील निर्यातीवर शुल्क लावल्यामुळे निर्यातीस ब्रेक लागला आहे. त्यामुळेच स्टीलचे भाव काही प्रमाणात कमी झाले आहे.'' - प्रशांत गांधी, स्टील व्यापारी, जळगाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.