Jalgaon News : राज्य सरकारने तीन जिल्ह्यातील १४ गड किल्ल्यांवर शौचालय बांधायण्यासंदर्भात शासकीय अध्यादेश काढला आहे. या विरोधात शिवभक्तांमध्ये संतपाची लाट पसरली आहे.
राज्य सरकारने शिवभक्तांच्या भावना भडकविण्याचे काम केल्याचा आरोप करुन शासनाने काढलेला ‘जीआर’ तत्काळ मागे अशी मागणी करीत येथील शिवभक्तांनी तहसील कार्यालयासमोर ‘जीआर’ होळी करुन शासनाचा निषेध केला. (demand of people not to build toilets in forts jalgaon news)
गड किल्ल्यांवर शौचालय बांधण्यासंदर्भात घेतलेला निर्णय चुकीचा असून या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास, शिवभक्त राज्यात एकाही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन राज्य करायचे आणि महाराजांनी स्वराज्यात उभे केलेल्या गडकिल्ल्यांचा जाज्वल्य इतिहास धुळीस मिळविण्याचा मनसुबा आखायचा हा ढोंगीपणा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यानी बंद करावा.
शासनाचे कटकारस्थान शिवरायांचे मावळे कदापी सफल होऊ देणार नाही. शासनाच्या सांस्कृतिक विभागाने काढलेला ‘जीआर’ तत्काळ मागे घ्यावा अन्यथा राज्यातील शिवभक्त आक्रमक आंदोलन करतील याची झळ शासनाला बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा येथील शिवभक्तांनी दिला आहे.
‘जीआर’च्या होळीप्रसंगी गणेश पवार, खुशाल पाटील, विजय पाटील, मनोज भोसले, किशोर पाटील, विलास मराठे, भरत नवले, तमाल देशमुख, दिनेश गायकवाड, मुकुंद पवार, सचिन शिंदे, ज्ञानेश्वर कोल्हे ,सतीश पवार, दीपक देशमुख, अनिल कोल्हे, छोटू अहिरे, पी. एन. पाटील, आर. बी. जगताप, प्रदीप मराठे, ज्ञानेश्वर शिंदे, विलास गवळी, दिलीप पाटील, विलास भोसले, प्रमोद वाघ, सुनील देशमुख, सचिन गायकवाड, ईश्वर पवार, गणेश गोसावी, दीपक नागणे, संजय चित्ते, किरण पवार, दत्तू पवार, योगेश पवार, विकास पवार, अण्णासाहेब धुमाळ, योगेश देशमुख, सचिन पवार, मनोज देशमुख, संजय पाटील, सोनाली लोखंडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.