जळगाव - जळगाव जिल्ह्यातील तापमान ४३ ते ४७ अंश सेल्सिअसवर पोचले असून तापमानाचा पारा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्माघाताचा धोका लक्षात घेऊन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ३ जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
खासगी शिकवण्यांनी वेळेत बदल करावा तसेच कामगारांना उष्णतेचा त्रास होऊ नये म्हणून कुलर पंख्यांची सोय करावी असे आदेशही देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आजपासून (ता.२५) ३ जूनच्या रात्री बारापर्यंत लागू राहतील. या कालावधीत अंगमेहनत करणाऱ्या कामगारांनी उन्हात काम करू नये. कामाच्या ठिकाणी शेड उभारले जावे, याची जबाबदारी ही कारखान्याच्या मालकाची असेल असे निर्देशांत म्हटले आहे.
एखाद्या मालकाने सोय केली नाही तर याबाबत संबंधित ग्रामपंचायत, नगरपरिषद, पोलिस विभाग यांच्याकडे तक्रार करता येईल. खासगी शिकवण्यांच्या संचालकांनी सकाळी दहापर्यंत कोचिंग सेंटर चालवावेत. त्यानंतर सकाळी १० ते ५ या वेळेत शिकवण्या सुरू ठेवायच्या असल्यास वर्गात पुरेसे पंखे, कुलर व तत्सम साधनांची व्यवस्था करावी असेही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.