Jalgaon News : ‘चला घ्या रे दरसन.. निंघा पंढरीले आज।’; श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे पंढरपूर कडे प्रस्थान

Departure of Shri Ram Palkhi to Pandhari
Departure of Shri Ram Palkhi to Pandhariesakal
Updated on

Jalgaon News :

‘‘अरे इठोबासारखं, देवदेवतं एकच

चला घ्या रे दरसन, निंघा पंढरीले आज’’

या कवयित्री बहिणाबाई चौधरींनी वर्णन केलेल्या संत मुक्ताबाई रामपालखीचे अत्यंत भक्तिमय वातावरणात शनिवारी (ता. ३) पंढरपूरकडे प्रस्थान झाले. (Departure of Shri Sant Muktabai Ram Palkhi to Pandharpur Jalgaon News )

जळगाव नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानची श्री संत मुक्ताबाई रामपालखी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी शनिवारी वटपौर्णिमेस मार्गस्थ झाली. श्रीराम मंदिर संस्थानचे मूळ पुरुष सत्‌पुरुष व कान्हदेशातील वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु श्री सद्‌गुरु आप्पा महाराज यांना वैशाख वैद्य दशमीस श्री संत मुक्ताईंचा दृष्टांत झाला.

शके १७९६ ज्येष्ठ पौर्णिमेस झालेल्या या आज्ञेनुसार श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्याची स्थापना झाली. यंदा पालखीस दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत. शुक्रवारी (ता. २) सायंकाळी पाचला जुन्या गावातील श्रीराम मंदिर येथून पालखीचे पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू झाले.

रात्री आप्पा महाराज समाधी येथे मुक्काम राहिला. शनिवारी सकाळी पालखी पंढरीच्या दिशेने निघाली. पालखी मार्गस्थ होण्याच्या अगोदर श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती मंगेश महाराज जोशी यांचे परंपरेचे भजन, श्रीसंत मुक्ताईंचे व प्रभू रामरायांचे नित्य पूजन व आरती आदी उपचार झाले.

Departure of Shri Ram Palkhi to Pandhari
NMC News : बांधकाम विभागाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; टेंडर काढून एजन्सी नियुक्त

टाळ मृदंगाच्या तालावर ‘ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरी, मुक्ताबाई मुक्ताबाई आदिशक्ती मुक्ताबाई’ असा जयघोष करत समस्त वारकरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले.

या वेळी श्रीराम मंदिर संस्थानचे विश्‍वस्त भरत अमळकर, ॲड. सुशील अत्रे, शिवाजी भोईटे, विवेक पुंडे, आमदार राजूमामा भोळे, हिंदू जनजागृती समितीचे प्रशांत जुवेकर, निखील कदम, जळगाव जनता बँकेचे सतीश मदाने, संजय बिर्ला, केमिस्ट संघटनेचे सुनील भंगाळे, ब्रह्मश्री बहुऊद्देशिय संस्थेचे संस्थापक अशोक वाघ, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे राजेश नाईक, गणानाम्‌ सत्संगाचे छोटू नेवे, प्रभाकर पाटील यांच्यासह शेकडो वारकरी या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Departure of Shri Ram Palkhi to Pandhari
Crime News : गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला पोलिस कोठडी

जैन इरिगेशनतर्फे स्वागत

श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेडतर्फे भव्य स्वागत करण्यात आले. सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (अॅग्री आर अँड डी) डॉ. अनिल ढाके यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा केली.

सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (अॅग्री बायोटेक आर अँड डी) डॉ. बी. के. यादव यांनी मंगेश महाराज यांची पाद्य पूजा केली. एचआरडी विभागाचे पी. एस. नाईक, एस. बी. ठाकरे, भिकेश जोशी, आर. डी. पाटील, जीआरएफचे समन्वयक उदय महाजन, जी. आर. पाटील यासह मीडिया विभागातील सहकारी उपस्थित होते.

कंपनीतर्फे राजा भोजच्या भीमराव दांडगे व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांची फराळाची व्यवस्था केली होती. दरम्यान, कंपनीने या यात्रेत मुक्ताबाईंच्या पालखीबरोबर मदत म्हणून एक वाहन उपलब्ध करुन दिले आहे. हे वाहन पालखीबरोबरच जाईल.

Departure of Shri Ram Palkhi to Pandhari
Crime News : ड्रममध्ये कोंडून ४ पोटच्या लेकरांची केली हत्या अन् स्वतःही घेतला गळफास; कारण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.