Jalgaon Crime: भावना लोढासह 5 अट्टल गुन्हेगारांची हद्दपारी; चोऱ्या- घरफोड्यांसह भामटेगिरीत महिलेची गँग अव्वल

Bhavna Lodha
Bhavna Lodhaesakal
Updated on

Jalgaon Crime : जिल्ह्यासह नाशिक-नगर आणि धावत्या रेल्वेत चोरी, घरफोड्या, लूटमारसह अन्य गंभीर गुन्ह्यात पारंगत असलेल्या भावना लोढा या अडतीस वर्षीय महिलेस तिच्या टोळीतील चार भामट्यांना वर्षभरासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे असलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी आज हद्दपारीचे आदेश पारित केले असून, या टोळीची जिल्ह्याबाहेर हकालपट्टी करण्यात आली आहे. (Deportation of 5 inveterate criminals including Bhavna Lodha woman gang tops fraud with burglaries Jalgaon Crime)

भावना जवाहरलाल लोढा (वय ३८, रा. अयोध्यानगर), टोळी सदस्य अनिल रमेश चौधरी (४०, रा. अयोध्यानगर), सय्यद सजील सय्यद हारून (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सय्यद आमीन सय्यद फारूख पटवे ऊर्फ बुलेट (२६, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण), सय्यद अराफत सय्यद फारुख (३४, रा. तांबापुरा) यांचा समावेश आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याकडील हद्दपार प्रस्तावानुसार वरील पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाणे, जामनेर पोलिस ठाणे, भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाणे, पहूर पोलिस ठाणे, चाळीसगाव शहर पोलिस ठाणे, नशिराबाद पोलिस ठाणे, चाळीसगाव रेल्वे पोलिस ठाण्यात एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या पाचही गुन्हेगारांच्या टोळीकडून मोठे गुन्हे करून अटक व त्यानंतर जामीन मिळाल्यावर पुन्हा गुन्ह्याचा प्रकार सुरूच असल्याने एमआयडीसी पोलिसांनी हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस उपअधीक्षक संदीप गावित यांच्याकडे पाठविला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhavna Lodha
Pune Crime : बंद घराचे कुलूप तोडून रोख रकमेसह दीड लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

त्यांचा शिक्कामोर्तब झाल्यावर अधीक्षक कार्यालयास प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, सुनील दामोदरे यांनी पाहिले.

या प्रस्तावानुसार पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी पाचही संशयितांच्या टोळीला एक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याच्या हद्दीपारीचे आदेश दिले आहेत.

निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, योगेश बारी, इमरान सय्यद, साईनाथ मुंडे, जमील शेख, निलोफर सय्यद, इम्तियाज खान अशांच्या पथकाने संशयितांना हद्दपारीची नोटीस बजावली.

Bhavna Lodha
Solapur Crime : वास्तुशांतीला गेल्यावर घरफोडी; घरात प्रवेश करून बेडरूममधील...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.