नैराश्‍यातील विवाहिता आत्महत्येपासून परावृत्त

या विवाहितेने आत्महत्येचा विचारही सोडला अन्‌ पुन्हा आत्मविश्वासाने जीवन जगायला लागलीय.
Depressed married woman refrains from suicide
Depressed married woman refrains from suicide
Updated on

जळगाव : शारीरिक व मानसिक त्रासाने नैराश्यात बुडालेल्या विवाहितेस फिट्स यायला लागल्या.. मात्र हे फिट्स तणावामुळे येत असल्याचे अचूक निदान डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात करण्यात आले.. त्यावर यशस्वी उपचार करून या विवाहितेने आत्महत्येचा विचारही सोडला अन्‌ पुन्हा आत्मविश्वासाने जीवन जगायला लागलीय. (Latest marathi news)

Depressed married woman refrains from suicide
700 मुलींना गर्भमुख कॅन्‍सर प्रतिबंधात्‍मक लस

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मेडिसीन विभागाच्या अतिदक्षता विभागात गेल्यावर्षी २५ वर्षीय दामिनी (नाव बदललेले) फिट्सच्या आल्याने अ‍ॅडमिट झाली होती. मेडिसीन तज्ज्ञ डॉ. चंद्रेय्या कांते, डॉ.पूजा तन्नीरवार यांनी औषधोपचार केले. तसेच मानसोपचार विभागाचे डॉ. विलास चव्हाण यांनी सुद्धा रुग्णाची भेट घेतली. याप्रसंगी रुग्ण महिलेच्या जीवनाची कथा जाणून घेत टेंशनमुळे फिट्स येत असल्याचे निदान करण्यात आले. मानसोपचार विभागातील डॉ.चव्हाण यांच्यासह डॉ.मुजाहिद शेख, डॉ.गोविंद यादव, समुपदेशक बबन ठाकरे यांनी रुग्णाचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले. यात औषधोपचारासह समुपदेशनही करण्यात आले. त्यातून ती सावरली असून सध्या भाड्याच्या घरात राहून, खासगी इस्पितळात काम करून मुलींचे शिक्षणही पूर्ण करण्याचे तिने ठरविले आहे.

Depressed married woman refrains from suicide
आयुर्वेद, एक संजीवन शास्त्र

''शारीरिक व मानसिक त्रासाने प्रकृती खराब झाली. मात्र डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात मला चांगले उपचार मिळाले व मी पूर्ण बरी होऊन स्वयंपूर्ण बनलीय. या उपचारातून मी आत्महत्येचा विचारही सोडून दिला.'' - उपचारार्थी महिला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.