Jalgaon : कमी पाऊस तरी खरिपाच्या पेरण्यांना वेग

farmers sowing
farmers sowingesakal
Updated on

जळगाव : जिल्ह्यात काल झालेल्या दमदार पावसाने (Heavy Rain) पेरण्यांना वेग आला आहे. गेल्या वीस पंचवीस दिवसांपासून समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या बाकी होत्या. शुक्रवारी जिल्ह्यात सर्वत्र बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकरी आज शेतात जाऊन पेरणी (sowing) करताना दिसून आले. (Despite low rainfall kharif sowing is in full swing jalgaon agriculture news)

जिल्ह्यात काल एकूण १२.३ मिलिमीटर पाऊस झाला. आतापर्यंत एकूण ६८ मिलिमीटर पाऊस झाला. भुसावळ, यावल, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, बोदवड या तालुक्यात दहा मिलिमीटरच्या वर पाऊस झाला. शनिवारी (ता. २५) दिवसभरही कडक उन्ह होते. या उन्हामुळे असह्य उकाड्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागला. कालही दिवसभर असह्य उकाडा झाला होता. सायंकाळी मात्र चांगल्या पावसाने हजेरी लावली आहे. बागायतदार शेतकऱ्यांनी जून सुरू होताच कपाशीच्या पेरण्या केल्या होत्या. यामुळे त्यांची पिके पाच ते दहा सेंटीमीटर एवढी वाढली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी काल अखेरपर्यंत पावसाची वाट पाहिली. काल बऱ्यापैकी पाऊस झाल्याने त्याही शेतकऱ्यांनी कापूस, उडीद, मुगाची पेरण्या सूरू केल्या आहेत.

farmers sowing
Nashik : उन्हाळ कांद्याचा बाजारभाव कमाल 1700, तर सरासरी 1200 रुपये

दमदार पावसाची गरज

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस समाधानकारक नाही. यामुळे अजूनही दमदार पावसाची गरज असल्याचे कृषी तज्ञ सांगतात. जोपर्यंत जमिनीतील उष्णता निघत नाही, तोपर्यंत असह्य उकाडा होतच राहणार आहे.

farmers sowing
साडेबाराशे नावे शेजारच्या प्रभागात

आजपासून जोर‘धार’

शहरासह जिल्ह्यात उद्यापासून (ता. २६) ते २८ जून दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागरिकांनी सतर्क राहूनच घराबाहेर पडावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()