Devgiri Short Film Fest : भारत, भारतीय संस्कृती बळकट करणारे चित्रपट तयार व्हावे

देवगिरी चित्रसाधनातर्फे होत असलेला तिसरा देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिव्हल शनिवार (ता. २७) व रविवारी (ता. २८) छत्रपती संभाजी नाट्यगृहात होत आहे.
While inaugurating the Devagiri Short Film Festival, Vice-Chancellor Dr. V. L. Maheshwari.
While inaugurating the Devagiri Short Film Festival, Vice-Chancellor Dr. V. L. Maheshwari.esakal
Updated on

Devgiri Short Film Fest : चित्रपटांच्या माध्यमातून भारतीय समाजमनावर आघात करण्यात आले. विविध कलाकृतींतून समाजमन डळमळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. कुटुंब संबंध टोकावर येऊन बसले आहेत.

समाजातील ही आव्हाने पाहता भारत आणि भारतीय संस्कृती, कुटुंबव्यवस्था बळकट करणारे चित्रपट तयार होणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन डॉ. भरत अमळकर यांनी केले. (Devagiri Short Film Festival is being held at Chhatrapati Sambhaji Theater on Saturday and Sunday jalgaon news)

जळगाव येथे तृतीय देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचे शनिवारी (ता. २७) त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. देवगिरी चित्रसाधनातर्फे होत असलेला तिसरा देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिव्हल शनिवार (ता. २७) व रविवारी (ता. २८) छत्रपती संभाजी नाट्यगृहात होत आहे.

शनिवारी पहिल्या दिवशी विविध शॉर्टफिल्मच्या स्क्रिनिंग दाखवण्यात आल्या. फेस्टिव्हलमध्ये ६२ शॉर्टफिल्म दाखवण्यात येत आहे. छत्रपती संभाजीनगर येथील नाट्यशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक डॉ. जयंत शेवतेकर यांनी ‘चित्रपट रसग्रहण’ या विषयावर मार्गदर्शन केले.

दिग्दर्शक शिवाजी पाटील यांनी पटकथा व दिग्दर्शन याबाबत मार्गदर्शन केले. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्र्वरी, अभिनेत्री सुरभी हांडे, स्वप्नील चामणीकर.

While inaugurating the Devagiri Short Film Festival, Vice-Chancellor Dr. V. L. Maheshwari.
International Short Film Festival : मुंबईत आंतराष्ट्रीय लघुपट महोत्सव संपन्न

संतोष तिवारी, केशवस्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अमळकर, विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभा पाटील, सचिव डॉ. रत्नाकर गोरे, हेमलता अमळकर, विनोद पाटील, रोहित नागभिडे, चित्र साधना प्रांत संयोजक किरण सोहळे, विनीत जोशी, संजय हांडे, सुचित्रा लोंढे आदी उपस्थित होते.

या वेळी मूकबधिर विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य आकर्षण ठरले. अभिनेत्री सुरभी हांडे म्हणाल्या, की जळगाव आणि विवेकानंद शाळेने मला सर्वप्रथम कला शिकवली.

जळगाव आणि खानदेशच्या भूमीतून कलाकार, दिग्दर्शक, निर्माते तयार झाले. येथे नवख्या कलाकारांना व्यासपीठ मिळणं गरजेचं होतं. देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टीवलने ही कमी पूर्ण केली आहे.

While inaugurating the Devagiri Short Film Festival, Vice-Chancellor Dr. V. L. Maheshwari.
Devgiri short film fest : जळगावला 27 पासून देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.