Jalgaon News : गावातील रस्त्याच्या कामासाठी रायल्टी भरून गौणखनिजांची परवानगी देण्यात यावी, अन्यथा गुरुवारपासून (ता. १३) कजगाव बसस्थानक चौकात रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा सरपंचांसह ग्रामपंचायत सदस्यांनी दिला आहे.
निवेदनाच्या प्रति वरिष्ठांना पाठविण्यात आल्या आहेत. (Development work stopped due to lack of secondary minerals in jalgaon news)
कजगाव ग्रामपंचायत हद्दीत गावातील अनेक रस्ते खराब झाले आहे. यासाठी ग्रामपंचतयीचे सरपंच व सदस्यांनी वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करून निधी मंजूर केला, तसेच निविदा देखील मंजूर केली, परंतु या रस्त्यांसाठी गौण खनिज नसल्याने रस्त्यांची कामे रखडलेली असून, रॉयल्टी भरून गौण खनिजाची परवानगी द्यावी, असे निवेदन कजगाव ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी मंगळवारी (ता. ११) भडगाव तहसीलदार मुकेश हिवाळे यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय यंत्रणेने कजगाव येथील रस्ते विकसित करण्यासाठी मंजुरी दिली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी कंत्राटदारास २० जूनला वर्कऑर्डर दिली आहे. परंतु गौणखनिज वाहतूक परवाना मिळत नसल्यामुळे गावातील रस्त्यांची कामे सुरू होऊ शकली नाहीत. पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अशा परिस्थितीत गावाच्या लोकांना पायी चालने शक्य होत नसल्याने शासकीय परवानगी दिल्यानंतर देखील आपण परवाना देत नसल्यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. ग्रामपंचायत कजगाव व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन सभेमध्ये निर्णय घेऊन गावातील रस्ते विकसित करण्यासाठी गौणखनिज परवाना न मिळाल्यास ग्रामस्थ बसस्थानक चौकात गुरुवारी (ता.१३) सकाळी दहाच्या सुमारास रस्तारोको आंदोलन करणार असल्याचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
निवेदनावर सरपंच रघुनाथ महाजन, सदस्य पुंडलिक सोनवणे, अक्षय मालचे, सादिक गणी मण्यार, कविता महाजन, अंजना सोनवणे, वैशाली हिरे, समाधान पवार, स्वीटी धाडीवाल, पल्लवी पाटील, सत्यभामा कोळी, मांगीलाल मोरे, शोभाबाई बोरसे यांच्या स्वाक्षऱ्या असून, निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जळगाव, उपविभागीय अधिकारी पाचोरा, पोलिस निरीक्षक भडगाव यांना देण्यात आल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.