Jalgaon News : धरणगाव, पारोळा, बोदवड,भडगावला नवीन बस आगारांची निर्मिती

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the review meeting of State Transport Board and Transport Departments.
Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the review meeting of State Transport Board and Transport Departments.esakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील धरणगाव, पारोळा, बोदवड आणि भडगाव येथे चार नवीन बस आगारांची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात राज्य परिवहन खात्याने प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी (ता. १६) दिली. राज्य परिवहन मंडळ व परिवहन खात्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

दरम्यान, मंत्री पाटील यांनी आरटीओ विभागाला जिल्ह्यातील अपघातप्रवण ७० ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. पालकमंत्र्यांनी या दोन्ही आढावा बैठकांमध्ये दोन्ही खात्यांची माहिती जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना विविध निर्देश दिले. (Dharangaon Parola Bodwad Bhadgaon bus stand Guardian Minister Patil Measures will be taken at 70 accident places Jalgaon News)

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकी झाल्या. पहिली बैठक राज्य परिवहन महामंडळाची झाली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्‍याम लोही, विभागीय नियंत्रक भगवान जगनोर, विभागीय वाहतूक अधिकारी दिलीप बंजारा, विभागीय अभियंता नीलेश पाटील, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत सोनवणे, मोटार वाहतूक निरीक्षक सुनील गुरव, सौरव पाटील, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.

प्रत्येक तालुक्यात एसटीचे एक आगार अपेक्षित असताना, जिल्ह्यात फक्त ११ आगार आहेत. धरणगाव, भडगाव, बोदवड आणि पारोळा येथे एसटी डेपो नसल्याने असुविधा होत असल्याबाबत चर्चा झाली. यावर पालकमंत्र्यांनी चारही ठिकाणी आगारांची निर्मिती करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असून, त्यासाठी स्थानिक पातळीवरून प्रस्ताव तयार करावेत.

आषाढी एकादशीसाठी जिल्ह्यातील विविध आगारांमधून पंढरपूरसाठी विशेष बस सोडाव्यात, असे निर्देश दिले. विद्यार्थ्यांना पाससाठी अडचणी होऊ नये, म्हणून त्याचे कार्यालय सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत उघडे राहावे. मोठ्या गावांमध्ये पास मिळण्याची व्यवस्था करावी, असे पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the review meeting of State Transport Board and Transport Departments.
Jalgaon Crime News : कुसुंब्यात घरफोडी; दागिन्यांसह लाखोंचा एवज लंपास

लोही, जगनोर यांचा सत्कार

बैठकीच्या प्रारंभी परिवहन महामंडळच्या जळगाव विभागाने राज्यात उत्पन्नाबाबत पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल विभागीय नियंत्रक जगनोर यांचा, तर महसुलात उत्तम कामगिरी करण्यासह जिल्ह्यातील अपघातांमध्ये ४० टक्के घट आल्याबद्दल श्री. लोही यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला.

आरटीओचे ९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण

मंत्री पाटील यांनी महसूल विभाग व परिवहन खात्याच्या मागील पाच वर्षांतील महसुलाबाबत आढावा घेतला. मागील चार वर्षांमध्ये जळगावच्या आरटीओ विभागाला ५७९ कोटी ४४ लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट होते.

त्यापैकी ५२६ कोटी ९२ लाख रुपये म्हणजेच सुमारे ९१ टक्के महसूल वसूल झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या आर्थिक वर्षात २०५ कोटी ९६ लाख उद्दिष्ट असताना, यातील २३ कोटी ८३ लाख वसुली झाल्याची माहिती देण्यात आली.

कर्की येथील सीमा तपासणी नाक्यावर चार वर्षांत २९ कोटी ६३ लाखांचे वसुलीचे उद्दिष्ट असताना, फक्त १४ कोटी ३४ लाख वसूल झाले. चोरवड येथील सीमा तपासणी नाक्यावर चार वर्षांत ५ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट असताना, २ कोटी ३९ लाख रुपयांची वसुली करण्यात आली.

Jalgaon: Guardian Minister Gulabrao Patil while giving instructions in the review meeting of State Transport Board and Transport Departments.
Jalgaon NMU News : ‘उमवि’ क्षेत्रातील 39 महाविद्यालये ‘ए’ श्रेणीत; विद्यापीठाकडून अंकेक्षण जाहीर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.