Dhule Dadar Express : धुळे -दादर एक्स्प्रेसचा चेहरा- मोहरा बदलणार...

Dhule Dadar Express will be equipped with 15 coaches of Lick Half Man Bush type jalgaon news
Dhule Dadar Express will be equipped with 15 coaches of Lick Half Man Bush type jalgaon newsesakal
Updated on

Dhule Dadar Express : प्रवाशांच्या पसंतीला पडलेल्या धुळे -दादर एक्स्प्रेसला आकर्षक रंगीतसंगतीचे एलएचबी डबे जोडण्यात येणार आहेत.

या डब्यामुळे गाडीचा चेहरा-मोहरा बदलणार असून प्रवाशांना बसल्या जागेवरून बाहेरील निसर्गसौंदर्य न्याहाळता येणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

मध्य रेल्वेच्या दादर-धुळे आणि दादर-मनमाड एक्स्प्रेसला २१ जुलैपासून इंटीग्रल कोच फॅक्टरी प्रकारातील डब्यांऐवजी लिके होल्फ मन बुश (एलएचबी) प्रकारचे १५ डबे जोडण्यात येणार आहेत. (Dhule Dadar Express will be equipped with 15 coaches of Lick Half Man Bush type jalgaon news)

त्याचबरोबर गाडी क्रमांक ०१०६५/६६ दादर-धुळे एक्स्प्रेसची रंगसंगतीही बदलण्यात येणार असून या गाड्या भविष्यात निळ्याऐवजी लाल करड्या रंगसंगतीत दिसणार आहेत.

धुळे -दादर एक्सप्रेसला प्रवाशांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत असल्याने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन ही एक्स्प्रेस दैनंदिन करण्याची मागणी कायम आहे. धुळे -मुंबई एक्स्प्रेस गाडी २९ एप्रिलपासून सुरू करण्यात आली. स्वातंत्र्यानंतर प्रथमच थेट धुळे येथून मुंबई जाण्यासाठी एक्स्प्रेस सुरू झाल्याने खानदेशातील प्रवाशांची मोठी सोय झाली आहे.

यापूर्वी दादर- अमृतसर एक्स्प्रेस व महाराष्ट्र एक्सप्रेसला धुळेसाठी बोग्या आरक्षित करून जोडल्या जात होत्या. मात्र कोरोनानंतर या बोग्या रद्द झाल्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. धुळ्यातून मुंबईला व्यापार, शिक्षणानिमित्त व शासकीय कामकाजानिमित्ताने जाणाऱ्या दैनंदिन प्रवाशांना चाळीसगाव गाठावे लागत होते.

मुंबईकडे जाण्यासाठी चाळीसगाव स्थानकात अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबत असल्या तरी या रेल्वे गाड्या अगोदरच फुल्ल होऊन येत असल्याने चाळीसगाव स्थानकावर प्रवाशांना कसरत करावी लागते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Dhule Dadar Express will be equipped with 15 coaches of Lick Half Man Bush type jalgaon news
Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये गुदमरतोय प्रवाशांचा जीव!

स्वतंत्र नविन गाडी सुरू झाल्याने खानदेशातील प्रवाशांना झटपट आरक्षण उपलब्ध होऊन दळणवळणास चालना मिळाली आहे.

या एक्सप्रेसला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यातच आता या रेल्वे गाडीचे डबे आकर्षक होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास सुखकारक होणार आहे. मात्र ही एक्स्प्रेस आठवड्यातून केवळ तीनच दिवस धावते. डाऊन दादर -धुळे एक्स्प्रेस ही दादरहून रविवार, सोमवार आणि शुक्रवार सायंकाळी ४.१५ वाजता सुटते व धुळे स्थानकावर रात्री ११.३५ वाजता पोहचते तर अप धुळे-दादर एक्स्प्रेस ही गाडी धुळे येथून सोमवार, मंगळवार व शनिवार सकाळी ६.३० वाजता सुटते व दादर येथे दुपारी १.१५ वाजता पोहचते.

त्यामुळे व्यापारी, नागरीकांना मुंबईत व्यापारानिमीत्त तसेच मंत्रालयात जाण्यासाठी ही गाडी सोईची ठरत आहे. ही एक्स्प्रेस आठवडयातून तीन दिवस धावणार असली तरी प्रवाशांचा प्रतिसाद पाहता ती दैनंदिन सुरू करण्याची गरज प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे मुंबईकडे जाणारा रेल्वे प्रवास खानदेशातील प्रवाशांसाठी आणखीच सुखकारक होईल. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ही एक्स्प्रेस नियमीत करावी, अशी मागणी कायम आहे.

Dhule Dadar Express will be equipped with 15 coaches of Lick Half Man Bush type jalgaon news
Dhule-Dadar Express: धुळे- दादर एक्स्प्रेसला 11 ऐवजी 15 डबे! या तारखेपासुन होणार अंमलबजावणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.