मित्राच्या मदतीने ST कर्मचाऱ्यानेच केली डिझेलची चोरी!

ST Bus
ST BusSakal
Updated on

चाळीसगाव (जि. जळगाव) : शहरातील पेट्रोलपंपावरून राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्याने दोघांच्या मदतीने बसमध्ये डिझेल भरण्याच्या नावाखाली खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरून डिझेलची चोरी केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, येथील राज्य परिवहन महामंडळाच्या आगारातील लिपीक संभाजी भास्कर काळे (रा. सायगाव, ता. चाळीसगाव) हा आपल्या दोघा मित्रांच्या सहकार्याने बसेसमध्ये डिझेल भरताना कमी भरुन जास्तीचे बिल घ्यायचा. बसचालक डिझेल भरल्यानंतर विश्‍वासाने सह्या करायचे. १० ते १४ मे दरम्यान संभाजी काळे याने शहरातील जयशंकर पेट्रोल पंपावर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये (क्रमांक (एम. एच. २० बीएल २४१२, एम. एच. ४० एन ९८१६, एम. एच. २० बीएल २३५७ व एम. एच. २० बीएल ३५०७) अशाच प्रकारे बिलाप्रमाणे डिझेल न भरता, परस्पर खासगी वाहनात ६७ लिटर डिझेल भरले. डिझेलची ही चोरी करण्यासाठी त्याला मौसीन सलीम शेख (रा. जुने विमानतळ, चाळीसगाव) व मयूर नामदेव म्हस्के (रा. मराठी शाळेच्यामागे, खरजई नाका, चाळीसगाव) यांनी मदत केली. त्यामुळे या तिघांनी ६७ लिटर डिझेलची चोरी केल्याचे समोर आल्याने आगार प्रमुख संदीप निकम यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीसात या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिझेलची ही चोरी नेमकी किती दिवसांपासून सुरु होती व यात आणखीन कोण कोण सहभागी आहे, यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

ST Bus
Jalgaon : दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला पकडले
ST Bus
जळगाव : बहिणीची छेड काढल्यावरून एकावर प्राणघातक हल्ला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.