Jalgaon News : ‘महाजनको’ च्या प्रकल्प संचालकपदी येथील अभय गोविंदा हरणे यांची नेमणूक झाली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील हरणे यांचा प्राध्यापक ते संचालक असा अनोखा प्रवास आहे. शिवाय, उत्तर महाराष्ट्रातून ‘महाजेनको’ च्या संचालकपदी नेमणूक झालेले हरणे हे पहिलेच आहेत.
हरणे यांचे वडील रेल्वेत लोकोफोरमन होते. भुसावळच्या न्यू इंग्लिश स्कूल (आताचे महाराणा प्रताप विद्यालय) मध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर जळगाव येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमध्ये त्यांनी इलेक्ट्रिकल या विषयात डिप्लोमा केला.(director of Mahagenco selected is abhay harne from bhusawal unique journey from ordinary family to professor to director Jalgaon News)
त्यानंतर पुढे शेगाव येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात बी. ई. केले. प्रथम त्यांनी भुसावळच्या संत गाडगेबाबा पॉलिटेक्निकमध्ये १९९१ मध्ये एक वर्ष प्राध्यापक म्हणून नोकरी केली.
अर्थार्जन करतानाच शिक्षणही सुरू ठेवले पुढे नोकरी सांभाळून फायनान्स विषयात एमबीए केले तसेच संगणकाच्या विविध भाषा अवगत केल्या. त्या वेळेच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळामध्ये १९९२ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून ते नोकरीस लागले. आपल्या कार्यकर्तृत्वाने पुढील वेगवेगळ्या पदावरच्या बढत्या त्यांना मिळत गेल्या.
यामध्ये कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, कार्यकारी अभियंता, उप मुख्य अभियंता आणि त्यानंतर स्वतंत्र वीज प्रकल्पाचे मुख्य अभियंता म्हणून त्यांनी काम केले. यामध्ये भुसावळच्या दीपनगर येथे देखील मुख्य अभियंता म्हणून काम केले. सध्या ते ‘महाजनको’च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर (ऑपरेशन) या पदावर कार्यरत होते.
आता त्यांची नेमणूक ‘महाजनको’च्या प्रकल्प संचालकपदी झाली आहे. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे. उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्र सरकारने आदर्श इंजिनिअर म्हणून त्यांचा सत्कार केला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
सामाजिक कार्यातही त्यांना आवड असल्याने रोटरॅक्ट क्लब, रोटरी क्लब ऑफ रेल सिटी यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. रोटरी क्लबचे चार्ट सेक्रेटरी, अध्यक्ष तसेच क्लबच्या विविध पदांवर त्यांनी काम केले. संगीत, नाटक अशा गोष्टींची देखील त्यांना आवड असल्याने कलावंतांना प्रोत्साहन देण्याचे काम करत असतात.
"वीज मंडळातील कनिष्ठ अभियंता ते संचालक हा २८ वर्षांचा प्रवास आम्हा हरणे परिवारासाठी अतिशय सुखदायक व अभिमानास्पद आहे."
- शकुंतला हरणे, अभय हरणे यांच्या आई
"शालेय जीवनापासूनच अभय हरणे यांच्यात अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे गुण होते. वर्गमित्र सर्वोच्च पदावर गेल्याचा तमाम भुसावळकरांना आनंद आहे."
- योगेश यावलकर, अभय हरणे यांचा वर्गमित्र
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.