Jalgaon News : बोरी उजव्या व डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग

Bori Canel Project News
Bori Canel Project Newsesakal
Updated on

पारोळा : खरिपाने शेतकऱ्यांची केलेली निराशा रब्बी हंगामातून दूर होण्याची आता दूर होणार आहे. यंदा दमदार पावसामुळे बोरी मध्यम प्रकल्प ओसंडून वाहिल्याने या पाण्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

खास रब्बीच्या पिकांसाठी ‘बोरी’तून पाण्याचे आवर्तन दिले जात असल्याने या पाण्यातून रब्बीचे पीक बहरणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

अवकाळी पावसामुळे तालुक्यासह शेतकऱ्यांचे खरीपाचे मोठे नुकसान झाले. मुख्य पीक असलेला कापूस देखील अति पावसामुळे पाण्याखाली गेला. हातचे उत्पन्न गेल्याने शेतकऱ्यांचे वार्षिक नियोजनच कोलमोडले. (Discharge of water through right and left canals of Bori Jalgaon News)

Bori Canel Project News
Jalgaon News : शिवसेना ठाकरे गट, भाजपत घोषणायुद्ध

ज्यातून शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा नैराश्य आले. मात्र, तरी देखील रब्बी हंगामात झालेल्या नुकसानाची भर काढू या भावनेतून पुन्हा उभारी घेत शेतकऱ्यांनी रब्बी पिकाच्या लागवडीचे नियोजन केले.

त्यानुसार, तालुक्यात रब्बी हंगाम शेतकऱ्यांनी घेतला असून या पिकांसाठी बोरी मध्यम प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून सिंचनासाठी आज सकाळी आठला ४२ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. या पाण्याचा आठ गावांना फायदा होणार आहे. दरम्यान, बोरी उजवा कालव्यातून पाण्याचे पहिले आवर्तन सुटले असून शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून सिंचन विभागाला सहकार्य करावे असे आवाहन सिंचन विभागाने केले आहे.

या गावांना होणार लाभ

बोरी मध्यम प्रकल्पात असलेल्या पाण्याचे गिरणा पाटबंधारे विभागाने नियोजन केले आहे. उजवा कालव्याच्या माध्यमातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा तामसवाडी, मुंदाणे, देवगाव, तरडी, जोगलखेडा, उंदीरखेडा व मेहू या गावांना या पाण्याचा लाभ होणार असून रब्बी हंगामातील अनेक पिके ओलिताखाली येणार आहे. उद्या (ता. २३) बोरीच्या डाव्या कालव्यातून ३५ क्युसेस पाणी सोडण्यात येणार असून या पाण्याचा फायदा तामसवाडी, तरडी, टोळी, शेवगे मुंदाणे, करंजी या गावांना होणार आहे. पहिले आवर्तन सोडण्याकामी सिंचन विभागाचे अजिंक्य पाटील, पी. जे. काकडे, व्ही. एम. पाटील, शशिकांत पाटील, धनराज माळी, विकास देवरे, अतुल पाटील, युवराज देवरे, नाना कुमावत, व्ही. एम. चौधरी यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Bori Canel Project News
Jalgaon News : फेब्रुवारीपासून जळगाव विमानतळावरून पुन्हा Take Off

आमदार भास्करराव पाटील यांची दूरदृष्टी

पारोळा तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झालेली असता, त्यावेळचे आमदार (कै.) भास्करराव पाटील यांनी दूरदृष्टी ठेवत तामसवाडी (ता. पारोळा) येथे बोरी प्रकल्पाची निर्मिती केली. शासन दरबारी पाठपुरावा करुन भरीव निधी उपलब्ध केला. ज्यामुळे आज तालुक्यासह शहराचा पिण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. एवढेच नव्हे तर त्यांनी शेतकऱ्यांना सिंचनाचा फायदा व्हावा म्हणून ‘बोरी’च्या डावा व उजवा कालव्याची देखील निर्मिती केली. त्यांच्या या दूरदृष्टीकोनामुळेच आज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत हे पाणी पोचत आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही सुटण्यास मदत झाली आहे.

"यंदा परिसरात तसेच पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बोरी धरण शंभर टक्के भरले. त्यामुळे पिण्याचा साठा बाजूला करत रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या पाणी मागणी अर्जानुसार बोरीच्या उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा व पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी."

- डी. पी. अग्रवाल, कार्यकारी अभियंता : गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव

Bori Canel Project News
Jalgaon News : शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे महिला दगावली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()