अमळनेर : मारवड येथील स्वस्त धान्य दुकानातून धान्य पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आल्याने झालेल्या तपासणीत धान्यसाठ्यामध्ये तफावत आढळून आली. या प्रकरणी दुकानाचा सेल्समन, वाहन चालक व मारवड येथील एका व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारवड येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक १०५, १०६ मधून सोमवारी (ता. २६) रात्री वाहन (जीजे ०५, सीव्ही ४८२९) मधून शासकीय तांदळाच्या आठ गोण्या घेऊन जात असताना गावातील नागरिकांनी रंगेहाथ पकडून महसूल अधिकाऱ्यांना बोलावले होते. (Discrepancies found in inspection at ration shops case has been registered with 3 suspects jalgaon news)
त्यावेळी सेल्समन अनिल काशिनाथ पाटील कुलूप लावून निघून गेला तर वाहनचालक प्रशांत विजय पाटील (रा. जैतपिर) याने सांगितले, की मला दिनेश वडर (रा. मारवड) याने माल घेऊन जाण्याबाबत सांगितले होते. त्यावरून दोन्ही दुकाने २६ ला रात्रीच सील करण्यात आली होती.
सील केलेली दोन्ही दुकाने २७ ला सकाळी नायब तहसीलदार संतोष बावणे यांनी ‘सील’ उघडून पंचनामा केला असता दिवाळी काळात वाटपसाठी असलेली साखर २ क्विंटल, डाळ १ क्विंटल व किरकोळ तेल आणि रवा असा माल शिल्लक होता तर अंत्योदय, प्राधान्य योजनेतील धान्य पुस्तकाप्रमाणे अपेक्षित गहू साठा ८५.१३ क्विंटल हवा असताना प्रत्यक्ष ८४ क्विंटल म्हणजे १.१३ क्विंटल कमी आढळून आला तर तांदूळ साठा १२५.२३ क्विंटल अपेक्षित असताना तो १४१.३० क्विंटल म्हणजे १६.०७ क्विंटल जादा आढळून आला.
हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....
याचा अर्थ ग्राहकांना वाटप करण्यात आला नाही. तसेच दुकानात लाभार्थी याद्या, किरकोळ विक्रीदर फलक नाही , दक्षता समिती सदस्य नावे आढळून आली नाही. म्हणून तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी आदेश दिल्यानुसार संतोष बावणे यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात अनिल पाटील, प्रशांत पाटील, दिनेश वडर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक जयेश खलाणे तपास करीत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.