जळगाव : दुचाकीचा धक्का लागल्याच्या गैरसमजातून दोन्ही मुलांसह महिलेला बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना दापोरा (ता.जळगाव) येथे घडली. जमावाच्या मारहाणीत (Mob Attack) जखमी वृद्धेस उपचारार्थ जळगावी हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू (Death) झाल्यानंतर मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. (Dispute over car cut Mother beaten to death by mob Jalgaon News)
नातलगांच्या माहितीनुसार, प्रमिलाबाई दिलीप सोनवणे (वय ५७) ह्या दोन मले व सुनांसोबत दापोरा येथे वास्तव्याला आहेत. शेतीचे काम करून त्या कुटुंबाला हातभार लावतात. बुधवारी (ता. १८ मे) दापोरा गावात लग्न होते.
असा झाला वाद
या लग्नासाठी बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन तरुण आले होते. त्यावेळी प्रमिलाबाई यांचा मुलगा विजय हा ओट्यावर बसलेला होता. त्याचवेळी घरासमोरून कार जात असताना एका अज्ञात दुचाकीचा कारला कट लागला. नंतर तो दुचाकीस्वार पळून गेला. कार चालकाने काही अंतरावर कार थांबवली. परत येऊन घराजवळ बसलेल्या विजयनेच कट मारल्याचा आरेाप करुन त्याला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. दोघांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाल्यावर कारचालक लग्नाच्या ठिकाणी निघून गेला.
जमावाचा हल्ला..
कारचालकाने काही वेळाने त्याच्या ओळखीच्या १०ते १५ तरुणांचा जमावासह येत सोनवणे कुटुंबीयांच्या घरावर हल्ला चढवला. घराबाहेर विजय सोनवणे याला मारहाण होत असल्याने विजयची आई प्रमिलाबाई, भाऊ अरूण आणि विजयची पत्नी प्रियंका असे, त्यांच्या बचावासाठी गर्दीत उतरले. सोडवा सोडव करत असताना या जमावाने वयोवृद्ध प्रमिलाबाई यांच्यासह त्यांच्या दोघा मुलांना व सुनेलाही बेदम मारहाण केली.
प्रमिलाबाईचा अखेर मृत्यू
या मारहाणीत प्रमिलाबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने जळगावी हलवण्यात आले. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात नेण्यात आले..उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू ओढवला.
संशयितांच्या अटकेची मागणी
प्रमिलाबाई सोनवणे यांना मारहाण करणारे व त्यांच्या मृत्यूस जबाबदार टोळक्याला अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नाईवाईकांनी केली होती. जळगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी मध्यस्थी करत मृतदेहाचे अंत्यसंस्कार झाल्यावर फिर्याद देण्यासाठी कुटुंबीयांना बोलावले असून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.