Jalgaon News : सामाजिक न्याय विभाग योजनांचा चित्ररथातून जागर

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी (दि.१६) हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला.
Dignitary while inaugurating the LED Chitraratha, which promotes and disseminates various schemes
Dignitary while inaugurating the LED Chitraratha, which promotes and disseminates various schemesesakal
Updated on

Jalgaon News : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे लाभार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या प्रचार, प्रसार करणाऱ्या एलईडी चित्ररथास पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगळवारी (दि.१६) हिरवा झेंडा दाखवून प्रारंभ केला. (Dissemination of social justice department schemes through film jalgaon news)

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना समाजातील‌ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे नियोजन चित्ररथाद्वारे करण्यात आले आहे.

अत्यंत सोप्या भाषेमध्ये विविध योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या चित्ररथाच्या माध्यमातून गावागावात दाखविण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये हा चित्ररथ फिरून माहिती देणार असून लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पालकमंत्री पाटील यांनी यावेळी केले.

अशा आहेत योजना..

चित्ररथामध्ये सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, अनुसूचित जाती उपाययोजना, पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना.

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांसाठी मार्जिन मनी उपलब्ध करून देणे, गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरवणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, मुला-मुलींसाठी शासकीय वसतीगृह.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करण्याची योजना, स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना.

अनुसूचित जाती उपयोजनांतर्गत गाय गट वाटप योजना, शेळी गट वाटप योजना, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन देणे, अस्वच्छ व्यवसायातील पालकांच्या मुलांना शालांतपूर्व शिष्यवृत्ती.

Dignitary while inaugurating the LED Chitraratha, which promotes and disseminates various schemes
Jalgaon News : रस्ता सुरक्षा 7 दिवसांचा नव्हे आयुष्याचा सप्ताह : गुलाबराव पाटील

अनुसूचित जाती प्रवर्गातील मुलींसाठी इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जातींच्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना.

माध्यमिक शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा देय योजना यासह इतर योजनांची माहिती व लाभार्थ्यांच्या मुलाखती या एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत.

Dignitary while inaugurating the LED Chitraratha, which promotes and disseminates various schemes
Jalgaon Municipality News : महापालिकेत 54 अनुकंपाधारकांना नियुक्ती आदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.