Jalgaon News : दिव्यांगांना दिली जाणारी मदत ही सामाजिक भावनेतून केली जात आहे. त्यात कृतज्ञता व विनम्रता भावना आहे. दिव्यांगांनी स्वतःतील सामर्थ्य ओळखून आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे राहावे. जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास ही मोठी ताकद आहे.
दिव्यांगांना मदत म्हणजे, ईश्वरी सेवा असून दिव्यांगांना आनंदमय जीवन जगता यावे, यासाठी सदैव त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.(Distribution of 125 electric tricycle to disabled jalgaon news)
जागतिक दिव्यांगदिनानिमित्त पाळधी येथे पालकमंत्र्यांच्या यांच्या हस्ते सुमारे १२५ इलेक्ट्रिक तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई येथील एच. डी. एफ. सी. बँकेचे वरिष्ठ उपाध्यक्ष राघवेंद्र स्वामी, उपाध्यक्ष अजिज गांधी यांची विशेष उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांनी स्वतः इलेक्ट्रिक तीनचाकी सायकल चालवत सादरीकरण केले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, भाऊसाहेब गुलाबराव पाटील फाउंडेशन व मित्र परिवारातर्फे हा कार्यक्रम झाला. पालकमंत्र्यांनी दिव्यांगांकडून समस्या जाणून घेतल्या.
ते म्हणाले, की तीनचाकी वापर व्यवसायासाठी प्रामाणिकपणे करून स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा. दिव्यांगांनी राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घ्यावा. येत्या १० डिसेंबरपासून सरपंच व ग्रामपंचायतींनी प्रत्येक गावात आभाकार्ड देण्यासाठी आयुष्यमान शिबिरे घ्यावीत.
सचिन भाटकर, खासगी सचिव अशोक पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डी. ओ. पाटील, शिवराज पाटील, संजय पाटील, गजानन पाटील, पवन सोनवणे, माजी सभापती प्रेमराज पाटील आदी उपस्थित होते. भूषण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. भाऊसाहेब गुलाबराव पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सोनवणे, अरुण पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.