Jalgaon News: जिल्ह्यात 7 महिन्यात 65 हजारांवर जात प्रमाणपत्रांचे वाटप; महसूल यंत्रणेचे जलद कामकाज

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon District Collector Ayush Prasad esakal
Updated on

Jalgaon News: उपविभागीय महसूल अधिकारी यांच्या स्वाक्षरीने देण्यात येणारे जात प्रमाणपत्र वाटपात जळगाव जिल्ह्यात महसूल यंत्रणेचे जलद कामकाज सुरू आहे. गेल्या ७ महिन्यात अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी प्रवर्गातील ६५ हजार १४२ जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली.

जात प्रमाणपत्रांचा फायदा विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, तरुणांना नोकरीसाठी, लाभार्थ्यांना घरकुल आणि महाडीबीटी सरकारी योजनेसाठी झाला आहे. (Distribution of caste certificates to 65 thousand in 7 months in district jalgaon news)

उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली सर्व महसूल यंत्रणेने हे काम केले आहे. जिल्ह्यात १५ तालुक्यांतील नागरिकांसाठी ७ उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांतर्फे जात प्रमाणपत्र वाटपाचे कामकाज केले जाते.

एप्रिल २०२२ ते मार्च २०२३ च्या तुलनेत यंदा एप्रिल ते ऑक्टोबर या ७ महिन्यात ५२ टक्क्यांहून अधिक काम अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्गाच्या जात प्रमाणपत्र वाटपाचे झाले. गेल्यावर्षी दररोज सरासरी २०० जात प्रमाणपत्र वाटप झाले‌. यंदा दररोज सरासरी ३०६ जात प्रमाणपत्र वाटप होत आहेत. २०२२-२३ मध्ये एकूण ७३ हजार २१७ जात प्रमाणपत्रांचे वाटप झाले होते.

गृहनिर्माण योजनेची यादी लवकर

जात प्रमाणपत्रामुळे लोक वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करू शकतात. जात प्रमाणपत्रामुळे रमाई, शबरी, प्रधानमंत्री आवास या गृहनिर्माण योजनांच्या लाभार्थ्यांची पहिली यादी वेळेत मंजूर होऊ शकते, असेही जिल्हा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Jalgaon District Collector Ayush Prasad
Jalgaon News: ...तर महापालिका 90 लाख ‘महावितरण’ला देणार : आयुक्त डॉ. गायकवाड

२४ हजार कुणबी दाखल्यांचे वितरण

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व कुणबी प्रमाणपत्र वाटपामध्ये आवश्‍यक कागदपत्रे आणि ऑनलाइन प्रक्रियेविषयीच्या जागृतीमुळे पारदर्शकता व गती आली आहे. २०२३ च्या सात महिन्यात अनुसूचित जातीचे ८ हजार २५९, अनुसूचित जमातीचे ७ हजार ८६१, कुणबी जातीचे २४ हजार १८६ जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत.

आकडे बोलतात

५ वर्षात वाटप केलेल्या प्रमाणपत्रांची संख्या

वर्ष प्रमाणपत्रांची संख्या

२०१८-१९ १३ हजार ६२१

२०१९-२० ५७ हजार ७५६

२०२०-२१ ४२ हजार ६१९

२०२१-२२ ५४ हजार २६६

२०२२-२३ ७३ हजार २१७

एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ ६५ हजार १४२

एकूण ३ लाख ६ हजार ६२१.

"जळगावमधून अधिक जण उच्च शिक्षणासाठी, सरकारी नोकरीसाठी अर्ज करत आहेत, हे जात प्रमाणपत्रांच्या वाटपाच्या वाढलेल्या संख्येवरून दिसून येत आहे. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी परिश्रम घेऊन वेळेत व योग्य प्रमाणपत्रे दिली आहेत." - आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव.

Jalgaon District Collector Ayush Prasad
Pink Toilet: जळगावमध्ये प्रमुख रस्त्यांवर साकारणार ‘पिंक टॉयलेट’; सुबोनियो केमिकल्स-मराठी प्रतिष्ठानचा उपक्रम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.