जळगाव : राज्य शासन रेशन दुकानामार्फत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना दिवाळीनिमित्त ‘दिवाळी किट’ (आनंदाचा शिधा) शंभर रुपयांत देत आहे. मात्र दिवाळी किट वाटपातील घोळ सुरू असला, तरी काही दुकानदारांना सर्व जिन्नस मिळाल्याने त्यांनी दिवाळीच्या मध्यरात्रीपर्यंत आनंदाचा शिधावाटप केल्याची उदाहरणेही आहेत. शहरातील तीन दुकानदारांनी रेशन दुकानासमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या, दिवाळीची सजावट करून दिवे लावून ग्राहकांना आनंदाचा शिधावाटप केला.
मोरया स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थतर्फे रेशन वॉर्ड क्रमांक ४२/१ शॉप नंबर ८७, अशोक मदनलाल पांडे वॉर्ड क्रमांक ४२ शॉप नंबर ८६, एस. एल. नाथ वॉर्ड क्रमांक ४२/२ शॉप क्रमांक ८८ या दुकानदारांनी दिवाळीच्या आदल्या दिवशी (ता. २३) मध्यरात्री बारापर्यंत, दिवाळीच्या दिवशी (ता. २४) मध्यरात्री साडेबारापर्यंत आनंदाचा शिधावाटप करून रेशनकार्डधारकांची दिवाळी गोड केली.(Distribution of Diwali kit at midnight Shopkeeper welcomed beneficiaries by removing rangolis Jalgaon News)
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजप-बाळासाहेबांची शिवसेना शासनाकडून नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रत्येकी एक किलो रवा, एक किलो साखर, एक किलो हरभराडाळ, एक लिटर पामतेल या चार शिधाजिन्नसांचा संच (दिवाळी किट) शंभर रुपयांत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आठ दिवसांपूर्वी या किटमधील जिन्नस रेशन दुकानदारांपर्यंत पोचल्या होत्या. मात्र या योजनेचे लाभार्थी सहा लाख २० हजार अन् पिशव्या आल्या आहेत केवळ ४२ हजार. त्यानंतर पिशव्यांअभावी दिवाळी किटचे वाटप रखडले होते. नंतर पिशव्या आल्या. मात्र कधी साखर, कधी तेल आले नसल्याच्या तक्रारी रेशनकार्डधारकांनी केल्या. यामुळे हा घोळ अद्यापही सुरूच आहे.
ज्या दुकानांवर सर्व जिन्नस पोचल्या त्यांनी रेशनकार्डधारकांची शंभर रुपयांत दिवाळी किट देऊन दिवाळी गोड केली. वरील तिन्ही दुकानधारकांना चारही वस्तूंचे संपूर्ण वाटप दुपारी चारला झाले. त्यांनी सायंकाळी सहापासून वाटप सुरू केले. ते मध्यरात्रीपर्यत सुरू होते. काही रेशनकार्डधारक बाहेरगावी गेलेले असल्याने त्यांचे किट शिल्लक आहे. आतापर्यंत ८५ टकके किटवाटप झाले आहे.
आतापर्यंत झालेले किटवाटप :
दुकान क्रमांक----किटची संख्या
४२---३४०
४२/१--५९९
४२/२--४१७
-------
"आनंदाचा शिधा किटमधील काही वस्तू पोचल्या, काही वस्तू पोचल्या नाहीत. रेशनकार्डधारकांना ज्या वस्तू उपलब्ध आहेत त्या वाटपाच्या सूचना राज्य शासनाच्या आहेत. यामुळे ऑफलाइनरीत्या आनंदाचा शिधा किटवाटप सुरू आहे. ज्या जिन्नस दिल्या त्याची नोंद व सही कार्डधारकाची घेतली जाते. उर्वरित वस्तू आल्यानंतर सर्व वस्तू मिळाल्याची नोंद घेतली जाणार आहे."
-प्रशांत कुळकर्णी,सहाय्यक पुरवठा अधिकारी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.