Jalgaon Election News : आगामी निवडणुकांसाठी जिल्हा प्रशासन सज्ज! जिल्ह्यात 3 हजार 564 मतदान केंद्र

सध्याच्या पुरुष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदारांच्या संख्येत सुमारे ८० हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
Collector Ayush Prasad, Chief Executive Officer Ankush etc. while starting the voting awareness chariot.
Collector Ayush Prasad, Chief Executive Officer Ankush etc. while starting the voting awareness chariot.esakal
Updated on

जळगाव : निवडणूक प्रशासन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले आहे. मंगळवारी (ता.२३ ) नवीन मतदारांच्या समावेशासह मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

सध्याच्या पुरुष व महिला मिळून ३४ लाख ९१ हजार ९८ मतदारांच्या संख्येत सुमारे ८० हजार नव मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात २०१९ लोकसभा निवडणुकीत ३ हजार ५५९ मतदान केंद्र होती.

या निवडणुकीत ५ मतदान‌ केंद्राची वाढ होत मतदान केंद्रांची संख्या ३ हजार ५६४ झाली आहे. (District administration ready for upcoming elections 3 thousand 564 polling stations in district Jalgaon News)

ईव्हीएम मशिनची टेस्टिंग करून दाखविताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.
ईव्हीएम मशिनची टेस्टिंग करून दाखविताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.esakal

जिल्ह्यात शहरी भागात १ हजार ६९ व ग्रामीण भागात २ हजार ४९५ मतदान केंद्र आहेत‌. मतदान केंद्राच्या ठिकाणे शहरी भागात ४३०, ग्रामीण भागात १६०८ असे एकूण २ हजार ३८ ठिकाणे आहेत.

याव्यतिरिक्त १४ ठिकाणी सहाय्यक मतदान केंद्र असू शकतात. कारण त्याठिकाणी मतदारांची संख्या १ हजार ५०० च्या वर आहे. १ हजार ७८२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगचे नियोजन करण्यात आले आहे. दुर्गम भागातील १६ मतदान केंद्रांवर मोबाईल नेटवर्क नाही.

पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करू इच्छिणाऱ्या गैरहजर मतदाराने सर्व तपशील भरून फॉर्म १२डी द्वारे संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी (आर.ओ.) कडे अर्ज करावा लागेल.

पोस्टल बॅलेट सुविधेची मागणी करणारे असे अर्ज निवडणुकीच्या घोषणेच्या तारखेपासून संबंधित निवडणुकीच्या अधिसूचनेच्या तारखेपासून पाच दिवसांच्या कालावधीत आरओ.कडे पोहोचवावेत, असे आवाहन उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी केले आहे.

दोन मतदान अधिकाऱ्यांचा समावेश असलेले मतदान पथक, एक व्हिडिओग्राफर आणि एक सुरक्षा व्यक्ती, मतदाराच्या घरी भेट देतात. मतदानाची संपूर्ण गुप्तता राखून मतदाराला पोस्टल बॅलेटवर मतदान करण्यास सांगतात.

असे मतदार घरबसल्या मतदान करू शकतात. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत, पुरुषांपेक्षा ७२ टक्क्यांहून अधिक महिलांनी नोंदणी केली आहे. लिंग गुणोत्तर दर १ हजार पुरुषांमागे ९२७ महिला असे आहे.

यात सुधारणा झाली आहे. २७ ऑक्टोबर २०२३ ते १७ जानेवारी २०२४ या कालावधीत १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या १६ हजार २२९ वरून ३८ हजार २९६ झाली आहे.

२०२२ पासून जिल्ह्यात एकूण ६३ हजार ७११ मतदारांची वाढ झाली आहे. २ लाख ४३ हजार १५ मतदारांची नावे हटवण्यात आली आहेत.३ लाख ६ हजार ७२६ मतदारांचा मतदार यादीत समावेश करण्यात आला आहे. २३ जानेवारी २०२४ रोजी मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

नवीन निवडणूक फोटो ओळखपत्र २ लाख ९१ हजार १७१ छापण्यात आले आहेत. टपाल विभागाकडून २ लाख ३६ हजार ११ निवडणूक

छायाचित्र ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. ५५ हजार १६० कार्डचे लवकरच वितरण केले जाणार आहे, असे श्री.चिंचकर यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोग व राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने राज्यातील आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारी व मतदार जागृती कार्यक्रमाचा दर आठवड्याला आढावा घेतला जात आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील तयारीबाबत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Collector Ayush Prasad, Chief Executive Officer Ankush etc. while starting the voting awareness chariot.
Nilesh Lanke Doctorate: कोरोना काळात केलेल्या कार्याचा हा सन्मान! नीलेश लंकेना डॉक्टरेट प्रदान

आकडे बोलतात..

* जिल्ह्यात बॅलेट युनिट--९३३९

* कंट्रोल युनिट--५४५०

* व्हीव्हीपीएटी मशिन--५७३३

* लोकसंख्या-- ४७ लाख ४० हजार ८८२

* मतदार संख्या -- ३४ लाख ९१ हजार ९८

* पुरूष मतदार--१८ लाख १२ हजार ७

* महिला मतदार --१६ लाख ७८ हजार ९५६

* तृतीयपंथी मतदार --१३५

* दिव्यांग मतदार-- १९ हजार २११

* ८० वर्षांवरील मतदार -१ लाख तीन हजार १२९

* मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग-१७८२

Collector Ayush Prasad, Chief Executive Officer Ankush etc. while starting the voting awareness chariot.
Dhule: नव्याकोऱ्या काँक्रिट रस्त्यावर डांबराचा लेप! निकृष्ट काम झाकण्यासाठी उपद्‍व्याप; ठेकेदार ब्लॅकलिस्टचे निर्देश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.