District Bank Election : जिल्हा बँकेत ‘राष्ट्रवादी’ला धक्का; बंडखोर संजय पवार अध्यक्षपदी

district bank election 2023 Sanjay Pawar as President in Zilla Bank jalgaon news
district bank election 2023 Sanjay Pawar as President in Zilla Bank jalgaon newsesakal
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसला जबरदस्त धक्का बसला आहे. पक्षाचे संजय पवार यांनी बंडखोरी करीत उमेदवारी दाखल केली. (district bank election 2023 Sanjay Pawar as President in Zilla Bank jalgaon news)

‘राष्ट्रवादी’चे ॲड. रवींद्र पाटील यांचा पराभव करून अध्यक्षपदी विजय मिळविला आहे. शिवसेना शिंदे गट, भाजप व शिवसेना ठाकरे गटाच्या एका संचालकानेही त्यांना मदत केली आहे. उपाध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

जळगाव जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी शनिवारी (ता. ११) सकाळी ११ ला जिल्हा बँकेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली. पीठासीन अध्यक्षपदी जिल्हा उपनिबंधक ‘सहकार’ संतोष बिडवई होते.

अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. त्याला सूचक गुलाबराव देवकर, तर अनुमोदक नाना राजमल पाटील होते. राष्ट्रवादीचेच संजय पवार यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

त्यांना सूचक शिवसेना ठाकरे गटाचे श्‍यामकांत सोनवणे, तर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील होते. उपाध्यक्षपदासाठी शिवसेना शिंदे गटाचे अमोल चिमणराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. उपाध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने अमोल पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी मतदान घेण्याचा निर्णय पीठासीन अध्यक्षांनी घेतला.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

district bank election 2023 Sanjay Pawar as President in Zilla Bank jalgaon news
Jalgaon News : दीर्घकाळ राहणाऱ्या खोकल्याचे रुग्ण अचानक वाढले; अशी घ्या काळजी...

‘राष्ट्रवादी’त पवारांची बंडखोरी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अध्यक्षतेखाली महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली होती. त्यात अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्या चार जणांपैकी ॲड. रवींद्र पाटील यांचे नाव एकमताने निश्‍चित करण्यात आले. मात्र संजय पवार यांनी आपल्याला संधी मिळावी, अशी मागणी कायम ठेवत बंडखोरी करून आपली उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे याच ठिकाणी पक्षाला धक्का बसला.

शिवसेना शिंदे गट भाजपची साथ

संजय पवार यांच्या उमेदवारीला शिवसेना शिंदे गटाच्या पाचही संचालकांनी तर भाजपच्या एका व शिवसेना ठाकरे गटाच्या एका संचालकांनी साथ दिली. त्यामुळे पवार यांच्या मताची संख्या आठ झाली होती. विजयासाठी त्यांना तीन मतांची आवश्‍यकता होती. कारण महाविकास आघाडीकडे तब्बल १३ मते होती. यात राष्ट्रवादी काँग्रेसची नऊ, शिवसेना ठाकरे गटाचे एक, काँग्रेसची तीन अशी मते होती.
तीन मते फोडून पवारांची बाजी

पीठासीन अध्यक्ष संतोष बिडवई यानी गुप्त मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला. यात महाविकास आघाडीची तेरा मते असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ॲड. रवींद्र पाटील यांचा विजय निश्‍चीत मानला जात होता. मात्र गुप्त मतदान पद्धतीने तीन मते फुटली आणि एक मताने संजय पवार यांनी बाजी मारली. त्यांना अकरा मते पडली, तर ॲड. रवींद्र पाटील यांना दहा मते पडली.

district bank election 2023 Sanjay Pawar as President in Zilla Bank jalgaon news
Cotton Crop Damage : कापसाला नाही भाव, कीटकांचा प्रादुर्भाव; साठवलेल्या कापसामुळे खाजेचे विकार

शिंदे गट भाजपकडून जल्लोष

राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर संजय पवार यांचा विजय होताच शिवसेना शिंदे गट व भाजपतर्फे जल्लोष करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री व शिंदे गटाचे नेते आमदार मंगेश चव्हाण, किशोर पाटील, चिमणराव पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. राज्याचे ग्रामविकासमंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जळगावातील जीएम फाउंडेशन येथे फटाक्यांची आतषबाजी करून श्री. पवार यांचा सत्कार करण्यात आला.

पवारांची गद्दारी, काँग्रेसची मते फुटली : खडसे

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रसचे संजय पवार यांनी पक्षाशी गद्दारी करून उमेदवारी अर्ज दाखल केला. आमच्या पक्षात गद्दारी झाली. त्यामुळे मित्र पक्षाची मते फुटली. त्यांना बोलून फायदा नाही. काँग्रेस पक्षाची तीन मते फुटली, मात्र हे सर्व पूर्वनियोजित होते. महाविकास आघाडीत फूट अपेक्षित नव्हती. पवार हे बंडखोरी करतील, असे आपणास माहिती होते. ते आपण वरही कळविले आहे. काँग्रेसची तीन मते फुटली आहेत. ही फूट आम्हाला अपेक्षित नव्हती.

बंडखोरी नव्हे, सहकारात न्याय मिळाला : पवार

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजय पवार म्हणाले, की मी बंडखोरी केलेली नाही. आजही मी राष्ट्रवादीत आहे. अजित पवार माझे नेते आहेत. सहकारात पक्ष नसतो, असेही ते म्हणतात. सहकार क्षेत्रातील चांगली मंडळी एकत्र येऊन त्यांनी मला सहकार साथ दिली आणि वीस वर्षांनी खऱ्या अर्थाने न्याय मिळाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील यांचे आपल्याला सहकार्य मिळाले.

district bank election 2023 Sanjay Pawar as President in Zilla Bank jalgaon news
Jalgaon News : कोविड काळातील गुन्हे मागे घेणार? 77 प्रस्तावांवर चर्चा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.