Jalgaon News : जिल्हाधिकाऱ्यांकडून संशयित गहू, तांदूळ ‘सील’चे आदेश

A sack of wheat and rice found by Collector Aman Mittal in the godown.
A sack of wheat and rice found by Collector Aman Mittal in the godown. esakal
Updated on

Jalgaon News : जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी (ता. ३१) रावेर येथील भेटीत ३ वेगवेगळ्या ठिकाणी गोदामांची तपासणी करून संशयावरून तिन्ही गोदामात आढळलेला संशयित गहू व तांदूळ सील करण्याचे आदेश दिले आहेत.

यामुळे शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. (District Collector orders to seal suspect wheat rice jalgaon news)

जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी बुधवारी (ता. ३१) सकाळी तालुक्यातील कळमोदा येथे वादळी पावसाने नुकसान झालेल्या केळी बागांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी रावेर येथे येऊन तडवी कॉलनी भागातील १ आणि बऱ्हाणपूर रस्त्यावरील २ अशा ३ वेगवेगळ्या गोदामांची तपासणी केली.

तडवी कॉलनीतील गोदामात मोठ्या प्रमाणात रिकामे बारदान आढळून आले असून, बऱ्हाणपूर रस्त्यावरील एका गोदामात ९७ पोते गहू, २०८ पोते तांदूळ आणि ११ पोते ज्वारी भरलेली आढळून आली तर अन्य एका गोदामात १२ क्विंटल तांदूळ आढळून आला आहे. ही गोदामे सील करण्याचे आदेश श्री. मित्तल यांनी पुरवठा विभागाला दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

A sack of wheat and rice found by Collector Aman Mittal in the godown.
Jalgaon Sharad Pawar : शरद पवार, अजित पवार या तारखेला अमळनेरात

या गोदामांचे मालक विलास चौधरी आणि आयुब शेख यांच्याकडे गोदामातील मालाबाबत विचारणा करण्यात आली असून, त्यांच्या खुलाशानंतर कारवाई करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. यावेळी फैजपूर येथील प्रांताधिकारी कैलास कडलग, रावेरचे तहसीलदार बी. ए. कापसे उपस्थित होते.

A sack of wheat and rice found by Collector Aman Mittal in the godown.
Deccan Queen Railway : ‘दख्खनची राणी’ झाली 93 वर्षांची..! मध्य रेल्वेची डीलक्स ट्रेन डायनिंग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.