Jalgaon ZP News : जिल्हाधिकारी जेव्हा विद्यार्थी बनतात; जि.प.शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी साधला संवाद

District Collector Ayush Prasad while sitting on the students' bench in Zilla Parishad School.
District Collector Ayush Prasad while sitting on the students' bench in Zilla Parishad School.esakal
Updated on

Jalgaon ZP News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कानळदा (जि. जळगाव) येथील जिल्हा परिषद शाळेस भेट देत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसमवेत ‘गणितासाठी १० दिवस’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यासह गणिताचे धडे गिरवीत शिक्षण घेतले.

तसेच शिक्षक बनून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत दोन्ही भूमिका त्यांनी बजावल्या.(district collector Visiting ZP School for 10 days maths activity jalgaon news )

जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी विद्यार्थ्यांना गणित आणि भाषेतील कौशल्ये शिकविण्यावर भर देण्याचा सल्ला दिला. गणिताची भीती बाळगू नका, तर त्याला खेळाप्रमाणे वागवा. ज्यांना योग्य उत्तर माहीत नाही त्यांना टाळू नका, शैक्षणिक वातावरण वाढविले पाहिजे, कारण आपण सर्वजण आपल्याला जे माहीत नाही ते शिकण्यासाठी शाळेत जातो. त्यांनी चुका केल्या तर समजावून सांगता.

विद्यार्थ्यांना समाजावून सांगत विषय सोपा करा. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी गणित महत्त्वाचे असते. एकमेकांना मदत करून पुढे जा, चांगल्या बाबींचा नेहमी सराव करा. चांगले जीवन जगण्यासाठी आणि चांगले माणूस बनण्यासाठी जीवनात प्रत्येकक्षणी गणितात गणित महत्त्वाचे असल्याचे देखील श्री. प्रसाद यांनी सांगितले. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील आदी उपस्थित होते.

District Collector Ayush Prasad while sitting on the students' bench in Zilla Parishad School.
Jalgaon ZP News : जिल्हा परिषदेत सहाशेवर रिक्त पदे भरणार

हसत खेळत शिकविले गणित

विद्यार्थ्यांसोबत जिल्हाधिकारी प्रसाद यांनी गणिताचा खेळ खेळला. संख्या ओळखणे, संख्यांची बेरीज करणे, एकक, दशकाची संकल्पना समजून घेणे या खेळात त्यांनी प्रामुख्याने सहभाग घेतला. विद्यार्थी जिल्हाधिकाऱ्यांसोबत खेळताना शिकताना आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा पाहत असल्याचे पाहत आहोत असे प्रतिपादन कानळद सरपंच आणि शाळा व्यवस्थापन समितीने व्यक्त केले.

शाळेतील सर्व भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतीने वित्त आयोगातून उपाययोजना करावी. शाळेतील प्रत्येक वर्गामध्ये पुरेशी प्रकाश व्यवस्था पुरेसा उजेड पुरेशी हवा. या सर्व बाबी महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी उपस्थित शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांना आणि सरपंचांना सांगितले. येत्या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांचे सर्व वर्ग प्रकाशमान केले असे आश्‍वासन पदाधिकारी यांनी दिले.

District Collector Ayush Prasad while sitting on the students' bench in Zilla Parishad School.
Jalgaon ZP CEO News : ‘फाईल ट्रॅकिंग सिस्‍टीम’ नागरिकांसाठीही खुली करणार! : जि. प. सीईओ अंकित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.