Jalgaon District Court : जिल्‍हा न्यायालयात गुरुवार-जन्मठेप, शुक्रवार-शनिवार सक्तमजुरी!

Jalgaon District Court : जिल्‍हा न्यायालयात गुरुवार-जन्मठेप, शुक्रवार-शनिवार सक्तमजुरी!
esakal
Updated on

Jalgaon News : जिल्‍हा व सत्र न्यायालयाने प्राणघातक हल्ला प्रकरणात दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. यापूर्वी गुरुवारी (ता. २९) भाऊबंदकीतील हत्याप्रकरणी जन्मठेप आणि शुक्रवारी (ता. ३०) पत्नीवरील प्राणघातक हल्ला प्रकरणात दोषी पतीला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे.

या तिन्ही शिक्षांचा युक्तिवाद ॲड. नीलेश चौधरी यांनी केला. (district court Sentenced different crime for 3 consecutive days jalgaon news)

मालकावर प्राणघातक हल्ला (ता. १ जुलै)

शहरातील वाघनगर परिसरात साईदर्शन फेब्रिकेशन वेल्डिंग दुकानावर संशयित दीपक दुसाने कामाला होता. त्यानंतर त्याने काम सोडले. २५ ऑक्टोबर २०१८ ला सकाळी नऊला दीपक दुकानावर आला. त्याने मालक सागर शंकर भामरे यांच्याकडे कामाचे राहिलेले पैसे मागितले. त्यावर सागर यांनी दुपारी बाराला पैसे घेऊन जा, असे सांगितले.

याचा राग आल्याने दीपक याने हातातील चाकूने सागर भामरे यांच्यावर वार करत जखमी केले. त्यानंतर तो पसार झाला. रामानंदनगर पोलिस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात खटला चालला.

सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांच्या साक्ष नोंदविण्यात आल्या. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद साक्षीदारांच्या साक्ष आणि तपासात निष्पन्न बाबींच्या अहवालानुसार संशयिताविरुद्ध दोषारोप सिद्ध झाल्याने शनिवारी (ता. १) दीपक दुसाने याला प्राणघातक हल्ल्याप्रकरणी दोन वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला. ॲड. नीलेश चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon District Court : जिल्‍हा न्यायालयात गुरुवार-जन्मठेप, शुक्रवार-शनिवार सक्तमजुरी!
Jalgaon Fraud Crime : रेल्वेप्रवाशांकडून पैसे उकळणारे तोतया टीसी पोलिसांच्या ताब्यात

पत्नीवरील हल्ल्यात सश्रम कारावास (३० जून)

भोद (ता. धरणगाव) येथील विवाहिता सुवर्णा मनोज देसले यांचा आणि पती मनोज देसले यांच्या कौटुंबिक वादात पती मनोज देसले याने चाकूने वार करून जीवघेणा हल्ला केला होता. हा खटला जिल्हा न्यायालयातील न्या. जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात सुरू होता. या खटल्यात १३ साक्षीदरांची साक्ष नोंदविण्यात आली.

यात विवाहितेसह तिचा मुलगा कौस्तुभ आणि वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने पती मनोज देसले याला दोषी ठरवत पाच वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा आणि दहा हजारांचा दंड ठोठावला. सहाय्यक सरकारी वकील ॲड. नीलेश चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

सख्ख्या भावाच्या खुनात जन्मठेप (२९ जून)

कळमसरे (ता. पाचोरा) लोहारा येथील शेतकरी दिलीप दत्तू डांबरे यांच्या सख्ख्या भावाने एक एकर शेत माझ्या एकट्याच्या नावे करून द्यावे, या अट्टाहासापोटी संजय दत्तू डांबरे याने त्यांचा शालक बापू मधुकर बागूल, उमेश मधुकर बागूल व मित्र विजय सुरसिंग राजपूत (रा. मोहाडी) यांना सोबत घेत भाऊ सुनील डांबरे, बहीण रेखाबाई व वैशाली डांबरे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.

Jalgaon District Court : जिल्‍हा न्यायालयात गुरुवार-जन्मठेप, शुक्रवार-शनिवार सक्तमजुरी!
Bawankule Jalgaon Daura : भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

तसेच दिलीप डांबरे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले. खटल्याचे कामकाज न्या. डी. एन. खडसे यांच्या न्यायालयात चालले. आरोपी संजय डांबरे, उमेश बागूल व विजय राजपूत (रा. मोहाडी) या तिघांविरुद्ध दोषारोप सिद्ध होऊन जिल्‍हा न्यायायलाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सहाय्यक सरकारी वकील ॲड. नीलेश चौधरी यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.

"तीनही खटल्यांत न्यायालयाने मेरिटवर निकालाची सुनावणी केली. पोलिस तपासातील अचूकता, वेळेत तपास पूर्ण करणे, पुरावे-वैद्यकीय अहवालासह इतर दस्तऐवज नीटनेटके दोषारोप पत्रासह सादर केले. खटल्यांचा सलग अभ्यास, गुन्हा घडला त्या दिवसाची परिस्थिती आणि गांभीर्य युक्तिवादातून न्यायालयात सादर करण्यात आले.

साक्षीदारांची साक्ष, प्रस्तुत पुरावे आणि सरकार पक्षाची प्रभावी बाजू यामुळे आरोपींवर दोषारोप निश्‍चिती झाली. सलग तीन दिवस शिक्षा हा केवळ योगायोग आहे, तिन्ही खटल्याचे कामकाज सलग सुरूच होते." - ॲड. नीलेश चौधरी सहाय्यक सरकारी अभियोक्ता

Jalgaon District Court : जिल्‍हा न्यायालयात गुरुवार-जन्मठेप, शुक्रवार-शनिवार सक्तमजुरी!
Bharat Jodo Abhiyan : लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला रोखणार; 130 जनसंघटनांचा सहभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.