Jalgaon : जिल्ह्यात जुलैत आतापर्यंत 37 टक्के पाऊस

Jalgaon Monsoon Update News
Jalgaon Monsoon Update Newsesakal
Updated on

जळगाव : शहरासह जिल्ह्यात जुलै महिन्यात गत महिन्यापेक्षा चांगला पाऊस (Rain) पडत आहे. शहरात गेल्या चोवीस तासात २४ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. यामुळे कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरी ७१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ३७ टक्के आहे. (district has received 37 per cent rainfall so far in July jalgaon monsoon update news)

जळगाव शहरासह भुसावळला शनिवारी (ता. ९) रात्री व रविवारी (ता. १०) सकाळी दमदार पाऊस झाल्याने अनेक भागातील रस्त्यावर पाणी साचले होते. महामार्गालगतच्या भागात विविध कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांना घराकडे जाण्यासाठी पाणी ओसरण्याची वाट पहावी लागली.

रविवारी पाऊस असल्याने अनेकांनी आज घरीच राहणे पसंत केले. गेल्या शुक्रवारपासून पाऊस वाढल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण करण्यावर भर दिला आहे. गेल्या आठवड्यात ६० टक्के पेरण्या झाल्या होत्या. त्या शंभर टक्के पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. सोबतच धरणाच्या पाणी साठ्यातही वाढ होत आहे. असाच पाऊस महिनाभर सुरू राहिल्यास सिंचन प्रकल्पात चांगला पाणीसाठा निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Jalgaon Monsoon Update News
जळगाव : अवघ्या 12 तासात चोरट्यांनी लंपास केल्या 3 दुचाकी

जुलैत पडलेला पाऊस मिलिमीटर मध्ये

तालुका-- शनिवारचा पाऊस--रविवारचा पाऊस--टक्केवारी

जळगाव--४५--१२५.५--५७.३

भुसावळ--५.५--३३.९--१७.४

यावल--१०.१--४०.०--१९.५

रावेर--९.३--४५.०--२४.६

मुक्ताईनगर--१४.७--३८.०--२१.६

अमळनेर--११.७--४२.९--२३.१

चोपडा--३३.९--६५.२--३०.४

एरंडोल--१९.७--७९.३--४१.४

पारोळा--२९.९--६१.६--३३.८

चाळीसगाव--२०.१--७१.३--४५.२

जामनेर--३९.४--९९.४--५०.३

पाचोरा--४८.७--१२४.८--६९.३

भडगाव--२८.२--१२३.४--७१.२

धरणगाव--१७.२--६२.१--२७.४

बोदवड--१.८--१७.८--८.७

एकूण--२३.९-७१.१--३७.६

मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठा

धरण--आजची पाणीपातळी--टक्केवारी

हतनूर--२०९.२३---१६.४

गिरणा--३८९.३६--३३.७८

वाघूर--२३१.१०--५८.०२

Jalgaon Monsoon Update News
Jalgaon Crime : 3 मिनिटांत घरफोडी अन्‌ संशयित विमानाने फुर्रऽऽ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.