District Milk Union : खडसे गटाच्या ‘सहकार’ला विमान; महाजन गटाच्या ‘शेतकरी’ला कपबशी

District Milk Union News
District Milk Union Newsesakal
Updated on

जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणुकीतील माघारीनंतर मैदानातील चित्र स्पष्ट झाले आहे. आज चिन्ह वाटप करण्यात आले. खडसे यांच्या नेतृत्वाखालील गट हा ‘सहकार पॅनल’असून त्यांना विमान चिन्ह, तर मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालील गट हा ‘शेतकरी पॅनल’असून त्यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे.

अपक्ष उमेदवार उषाबाई विश्‍वास पाटील यांना कपाट चिन्ह देण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही गटांनी प्रचार सुरू केला असून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेण्यात येत आहे.

जिल्हा दूध संघाच्या संचालक निवडणुकीसाठी प्रचाराचा धडाका सुरू झाला आहे, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात ‘सहकार’पॅनल तर्फे उमेदवार घरोघरी जाऊन प्रचार सुरू झाला असून मतदारांच्या भेटी घेण्यात येत आहे. (District Milk Union Election Eknath Khadse group Cooperation Symbol is Airplane Girish Mahajan Farmer Symbol is Cup Bashi Jalgaon News)

हेही वाचा : काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

District Milk Union News
Jalgaon Crime News : खुनाच्या गुन्ह्यातील संशयित नव्वव्या दिवशी बाहेर

आज एरंडोल व जळगाव तालुक्यातील मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या, तर मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात ‘शेतकरी’पॅनलतर्फे चोपडा मतदार संघात मेळावा घेण्यात आला. त्या ठिकाणी मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना जिल्हा दूध संघात करण्यात येणाऱ्या आगामी काळात करण्यात येणाऱ्या विकासकामांची माहिती देण्यात आली.

दिलीप वाघ बिनविरोध जाहीर

पाचोरा तालुका मतदार संघातून मंत्री महाजन गटाचे आमदार किशोर पाटील यांनी माघार घेतली. त्यामुळे खडसे गटातून महाजन यांच्या गटात आलेले पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.संतोष बिडवई यांनी त्यांची अधिकृतपणे बिनविरोध निवड जाहीर केली. दिलीप वाघ बिनविरोध असल्यामुळे दोन्ही गटाच्या पॅनलमध्ये त्यांचे नाव नाही. त्यामुळे आता वाघ यानीच आपण कोणत्या पॅनलमध्ये आहे,हे अधिकृतपणे स्वत:च जाहीर करावयाचे आहे.

District Milk Union News
Jalgaon News : जिल्हा दूध संघ निवडणूक 20 डिसेंबरनंतर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()