जळगाव : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपद निवडणुकीसाठी गुरुवार (ता. ३)पासून रणधुमाळी सुरू होत असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेसची महाविकास आघाडी, तर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) युतीत लढत होण्याची शक्यता असून, दोन्हींकडून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे.
जिल्हा उपनिबंधक (सहकार) संतोष बिडवई यांची निवडणूक निर्णय अधिकरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीचे कार्यालय जिल्हा दूध संघाच्या कार्यालयाच्या आवारातच उभारण्यात येत आहे. या ठिकाणीच उमेदवारी अर्ज विक्री करण्यात येणार आहे, तर उमेदवारी अर्जही याच ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे. सकाळी अकरापासून अर्ज विक्री व दाखल करण्यास प्रारंभ होणार असून, दुपारी तीनपर्यंतही मुदत असणार आहे. १० नोव्हेंबरपर्यंत अर्ज घेण्याची व दाखल करण्याची मुदत आहे.(District Milk Union Election for form sale started in Sangh premises Jalgaon News)
राजकीय वातावरण तापणार
राज्यात शिवसेना फुटल्यानंतर सत्तांतर झाले आहे. जळगाव जिल्ह्यातही शिवसेनेला फुटीचा मोठा फटका बसला आहे. सर्व पाचही आमदारांनी शिवसेना ठाकरे गट सोडला आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटाची राज्यात सत्ता स्थापन झाली आहे. भाजपचे गिरीश महाजन व शिंदे गटाचे गुलाबराव पाटील मंत्री झाले आहेत.
पाटील यांच्याकडे पालकमंत्रिपद आले आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून दोघा मंत्र्यांचा कस लागणार आहे, तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) व काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडीही मैदानात उतरणार आहे. सध्या दूध संघावर एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली सत्ता आहे. महाविकास आघाडीचे नेतृत्व खडसे यांच्याकडेच असणार आहे. त्यामुळे ही सत्ता राखण्याचे मोठे आव्हान एकनाथ खडसे यांच्यासमोर असणार आहे. त्यामुळे जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय वातावरणही तापणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.