District Milk Union : उमेदवारांच्या भवितव्यावर आज शिक्का

District Milk Union Election
District Milk Union Electionesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघाच्या संचालकपदासाठी शनिवारी (ता. १०) मतदान होणार आहे. जिल्ह्यात सात मतदान केंद्रे असून, त्या ठिकाणी मतदानाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी आहे. रविवारी (ता. ११) जळगाव येथील सत्यवल्लभ हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे.

जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या १९ जागांसाठी शनिवारी मतदान होणार आहे. एका मतदाराला १९ मते देण्याचा अधिकार आहे. ४४१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात एकूण सात मतदान केंद्रे सज्ज ठेवली आहेत. (District Milk Union Election Voting Process Start From Today Jalgaon News)

हेही वाचा : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

District Milk Union Election
Dada Bhuse : मंत्री दादा भुसेंचे समर्थकच आमने- सामने

अमळनेर, भुसावळ, चाळीसगाव, एरंडोल, फैजपूर, जळगाव व पाचोरा या ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंदावर दोन बूथ असतील. त्या ठिकाणी मतदान करता येणार आहे. सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ होणार आहे. दुपारी चारपर्यंत मतदान करता येणार आहे. जळगाव येथील मतदान केंद्र रिंग रोडवरील जिल्हा बँकेसमोरील गल्लीत सत्यवल्लभ हॉलमध्ये आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर ४२ कर्मचारी असतील.

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

मतदान केंद्रात उमेदवार किंवा मतदारांना मोबाईल घेऊन जाता येणार नाही. त्यांना आपला मोबाईल बाहेरच ठेवावा लागणार आहे. मतदान केंद्राबाहेर एक ट्रेमध्ये मोबाईल ठेवता येणार आहे. मतदान केंद्रावर संपूर्ण व्हीडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. सर्वच मतदान केंद्रांवर पोलिस बंदोबस्त चोख राहणार आहे.

रविवारी मतमोजणी

जळगाव येथील रिंग रोडवरील सत्यवल्लभ हॉलमध्ये रविवार (ता.११) सकाळी आठपासून मतमोजणी करण्यात येणार आहे. मतमोजणीाठी सात टेबल असतील व २१ कर्मचारी असतील. या वेळीही चोख पोलिस बंदोबस्त राहणार आहे.

District Milk Union Election
Nashik Crime News : खुनाची माहिती द्यायला 112 नंबरवर त्याने पोलिसांना कॉल केला अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.