Milk Rate Hike : जिल्हा दूध संघातर्फे कुलींगच्या दूध दरात 30 टक्क्यांनी वाढ!

Hike In Milk Rate latest marathi news
Hike In Milk Rate latest marathi newsesakal
Updated on

जळगाव : जिल्हा दूध संघातर्फे बल्क कुलींग सेंटरच्या दूधात आता प्रतिलीटरमागे ३० टक्क्यांनी वाढ (Milk Rate Hike) करण्यात आली आहे.

संचालकांच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. (district milk union has now increased bulk cooling center milk by 30 per cent per liter jalgaon news)

जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी (ता. २७) आज दुपारी दोनला झाली. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार मंगेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. बैठकीच्या अजेंड्यावरील ३७ विषय मंजूर करण्यात आले.

जिल्हा दूध संघातर्फे बल्क कुलींग सेंटरच्या दरात ३० टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी कुलींग सेंटरला ३० पैसे प्रतिलीटरप्रमाणे दर दिला जात होता. तो आता ४३ पैसे प्रतिलीटरप्रमाणे देण्यात येणार आहे. जिल्ह्यात तब्बल २२ बल्क कुलींग सेंटर आहेत. गेल्या पाच वर्षांपासून दरवाढ करण्याची मागणी होत होती.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

Hike In Milk Rate latest marathi news
Market Committee Election : बाजार समिती निवडणुकीत ‘युती’चा प्रयत्न? भाजपच्या बैठकीत निर्णय

प्रथमच ती मंजूर करण्यात आली आहे. संजय पवार, मधुकर राणे, रोहित निकम, रावसाहेब भोसले, ठकसेन पाटील, नितीन चौधरी, प्रमोद पाटील, दिलीप वाघ, पराग मोरे, श्‍यामलताई झांबरे, पूनम पाटील, छाया देवकर, रमेश पाटील, कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे या वेळी उपस्थित होते.

Hike In Milk Rate latest marathi news
Jalgaon News : सर्व शाळांची 1 एप्रिलपासून वेळ बदलणार : जिल्हाधिकारी मित्तल; जाणून घ्या नवीन वेळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()