District Milk Union Jalgaon : अखाद्यचा गुंता सोडविण्यासाठी SIT स्थापन करावी

District Milk Union News
District Milk Union Newsesakal
Updated on

जळगाव : जिल्‍हा दूध उत्पादक संघाला खाण्यास अयोग्य (अखाद्य) कुठलाही पदार्थ, पशुखाद्य किंवा तत्सम बाय-प्राडक्ट तयार करण्याचा परवाना केंद्रीय अन्न औषध प्रशासनाने दिलेला नाही. कायद्याचे सर्रास उल्लंघन करून संशयितांनी जनआरोग्याशी खेळ केला आहे. परिणामी, या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त पथक गठित करण्याचे पत्र जळगाव अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांना दिले आहे.

जिल्हा दूध संघातील अपहार प्रकरणी पोलिस अन्न व औषध प्रशासनास पत्र पाठवून मदतीची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त संदीप पतंगे यांनी तपासधिकारी तथा सहाय्यक पोलिस अधीक्षक (गृह) संदीप गावित यांना पत्र दिले आहे. पत्रात नमूद केले आहे, की जिल्हा दूध उत्पादक संघाने ‘स्पॉईल्ड फॅट’ या अखाद्य पदार्थाचे उत्पादन करून त्याची विक्री विठ्ठल रुख्मिणी एजन्सीला केली आहे.(District Milk Union SIT constituted to solve problem of Akhadya FDA letter to police Sale of non edible ghee without permission Jalgaon News)

District Milk Union News
Jalgaon Crime News : मुलींना इशारे करणाऱ्याला दिला चोप; नारळपाणी विक्रेत्याला अटक

तर, विठ्ठल रुख्मिणी एजन्सीचे हरी रामू पाटील यांनी केलादेवी कुटीर उद्योग व रवी अग्रवाल (अकोला) यांना अखाद्य तूप विक्री केले. त्याच तुपातून नंतर राजेमलाई चॉकलेटची निर्मिती झाली. गुन्ह्यात नमूद अखाद्य तूप पदार्थ मानवी सेवनास अपायकारक असल्याने याप्रकरणी जाणीवपूर्वक खरेदी-विक्रीची बिले दिली व घेतली गेलेली नाहीत, असे दिसून येते. मात्र, याबाबतचा अर्थिक व्यवहार झाला असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.

केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन

जळगाव दूध उत्पादक संघाने केंद्रीय अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत केंद्रीय अन्न परवाना घेतला आहे. फक्त दूध आणि दुग्धजन्य अन्न पदार्थांचे उत्पादन, पॅकिंग व विक्री करण्यासाठीच दिला आहे. असे असताना ‘स्पॉईल्ड फॅट’ या अखाद्य पदार्थाचे बेकायदेशीर उत्पादन करून त्यांच्या अधिकृत विठ्ठल रुख्मिणी एजन्सीला विक्री केल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची...

District Milk Union News
Passport Seva Kendra : विमानसेवेपाठोपाठ नाशिकमधील पासपोर्ट सेवाही ठप्प

सखोल तपास आवश्यक

अन्न परवान्यातील अट क्रमांक सहानुसार अन्न परवान्यावर नमूद पदार्थाव्यतिरीक्त इतर कोणताही पदार्थ अस्थापनेमध्ये उत्पादित करता येत नाही. असे असताना दूध संघाने अखाद्य पदार्थ उत्पादित करून त्याची मोठ्या प्रमाणात विक्री करून जनसमान्यांच्या आरेाग्याशी खेळ केला. अन्न सुरक्षा मानके कायद्यातील तरतुदीनुसार याची सर्वस्वी जबाबदारी नॉमिनी व व्यवस्थापक (गुणवत्ता हमी) विजेश परमार यांची आहे. दूध संघात कधीपासून बेकायदेशीर ‘स्पॉईल्ड फॅट’चे उत्पादन सुरू केले आहे व आजपर्यंत त्याची विक्री कोणकोणत्या अस्थापनेला केली आहे व त्याचा वापर अन्न पदार्थात कोठे-कोठे झाला, याबाबत सखोल तपास करणे आवश्यक आहे, असेही पत्रात नमूद केले आहे.

संशयितांची कारागृहात रवानगी

दूध संघ अपहार प्रकरणात कार्यकारी अधिकारी मनोज लिमये, हरी पाटील, अनिल अग्रवाल आणि रवी अग्रवाल, चंद्रकांत पाटील, किशोर काशिनाथ पाटील या सहा संशयितांची पोलिस कोठडी पूर्ण होऊन त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात झाली आहे.

District Milk Union News
Eknath Khadse | गिरीश महाजनांनी अत्यंत खालची पातळी गाठली : एकनाथ खडसे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.