जळगाव : एकनाथ खडसे राज्यातील मोठे नेते आहेत, त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्याने पोलिस ठाण्यासमोर झोपावे हे मला बरोबर वाटले नाही, असा टोला राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसे यांना लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व आमदार खडसे यांनी जिल्हा दूध संघ गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले, की एवढ्या मोठ्या नेत्याने पोलिस ठाण्यासमोर झोपावे हे मला बरोबर वाटले नाही, जिल्हा दूध संघामध्ये ज्यांनी भ्रष्टचार केला असेल त्यांच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी सरकारची आहे, सरकार ती कारवाई करणारच आहे.(District Milk Union Theft Case Khadse withdrew Thiyaa Agitation Jalgaon News)
पोलिसांवर कोणताही राजकीय दबाव नाही. दबाव असता तर आमचे राजकीय मित्रपक्षाचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात पोलिसांना निवेदन देण्यासाठी गेले नसते. श्री. खडसे पालकमंत्री असताना त्यांनी चॅलेंज स्वीकारून सांगावे अवैध धंदे सुरू नव्हते का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
वेळ येईल तेव्हा समोरासमोर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला समोरासमोर येण्याचे आवाहन केले आहे. त्याबाबत बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, की निवडणूका घरात बसून ऑनलाइन होत नाहीत. समोरासमोर होत असतात. ज्या वेळी वेळ येईल त्या वेळी समोरासमोर होईलच, असा थेट इशाराही त्यांनी दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.