Police Transfer News : महिनाअखेर पोलिस बदल्यांचा पोळा फुटणार

Transfers of police news
Transfers of police newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दलाच्या अस्थापनेवरील बदलीस पात्र कर्मचाऱ्यांची महिनाअखेर बदली होण्याचे संकेत जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दिले आहेत. कार्यकाळ संपलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची इच्छित जागेवरील बदलीसाठी धावपळ सुरू झाली आहे.

एकाच पोलिस ठाण्यात सहा वर्षे, एका उपविभागात १२ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कार्यकाळ होत असलेल्या बदली पात्र कर्मचाऱ्यांची यादी तयार झाली आहे.

बदलीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना इच्छित जागांसाठी बदली समितीला तीन पसंतीक्रम दर्शवायचे असून, पहिल्या पसंतीक्रमात सर्वाधिक पसंती एलसीबी, वाहतूक शाखेसह व्यस्त असलेल्या पोलिस ठाण्यांना दिली आहे.(District Police Force will be transferred at the end of the month Fielding of employees for cream postings with desired vacancies Jalgaon News)

Transfers of police news
Homestead Bill News : घरपट्टीच्या नावाने धुळेकरांची लूट थांबवा : शिवसेना (उबाठा)

हे ठाणे हवे, ते नकोत

त्यात एमआयडीसी, चाळीसगाव, रावेर, भुसावळ तालुका, जळगाव तालुका, सायबर पोलिस ठाणे, जामनेर ,नशिराबाद, पाळधी दूरक्षेत्र, महामार्ग वाहतूक शाखा आदींसाठी पहिला पसंतीक्रम नोंदविण्यात आला आहे. रामानंद, भुसावळ बाजारपेठ, जळगाव शहर, अमळनेर तालुक्यातील मारवड, मुक्ताईनगर, कासोदा आदी पोलिस ठाण्यांना कर्मचाऱ्यांनी नापसंती दर्शविली आहे.

वशिल्यांसाठी धावपळ

जिल्ह्यातील आमदारांचे सुरक्षारक्षक, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आरटीपीसी, उल्लेखनीय कामगिरीत सहभागी कर्मचाऱ्यांनी नियोजित बदलीची पूर्वीपासूनच तयारी करून ठेवली असून, विधानसभा मतदारसंघातील कर्मचाऱ्यांच्या त्या-त्या ठिकाणचे आमदार, मंत्र्यांकडे चकरा वाढल्या आहेत.

बदल्यांसाठी पूर्वी जामनेर आणि मुक्ताईनगर, अशा दोनच याद्या असायच्या. आता मात्र पाळधी, पाचोरा, अमळनेर आणि चाळीसगावचीही यादीत भर झाली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Transfers of police news
Drainage Cleaning News : धुळ्यातील नालेसफाई केवळ कागदावर

"आवश्यक मनुष्यबळाची गरज, पोलिस ठाण्यातील तपासाधिकारी, संगणक, गुन्हे शोध पथकात तांत्रिक, कागदोपत्री विशिष्ठ प्रवीण्यप्राप्त कर्मचाऱ्यांची उपलब्धता आणि एकूणच सारासार विचार करून यंदाच्या बदल्यांचे नियोजन असून, महिनाअखेर बदल्याचे आदेश पारीत होण्याची शक्यता आहे."

-एम. राजकुमार, जिल्‍हा पोलिस अधीक्षक

Transfers of police news
Jalgaon Crime News : बँकेचा बोजा असलेल्या प्लॉट विक्रीतून फसवणूक; नाशिकच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.